कुलीचा ड्रेस डोक्यावर सामान अन्…; आनंद विहार रेल्वे स्टेशनवर दिसला राहुल गांधींचा नवा ‘अवतार’

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज एकदमच वेगळ्या रुपात दिसले. कधी ट्रकचालकांशी गप्पा, कधी थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. आज मात्र राजधानी नवी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशन गाठले. येथे त्यांनी हमालाचा गणवेश परिधान करत चक्क प्रवाशांचे सामानही उचलले. या खास प्रसंगाचा व्हिडीओ काँग्रेस (Congress) पक्षाने राहुल गांधी आणि […]

Rahul Gandhi 3

Rahul Gandhi 3

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज एकदमच वेगळ्या रुपात दिसले. कधी ट्रकचालकांशी गप्पा, कधी थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. आज मात्र राजधानी नवी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशन गाठले. येथे त्यांनी हमालाचा गणवेश परिधान करत चक्क प्रवाशांचे सामानही उचलले. या खास प्रसंगाचा व्हिडीओ काँग्रेस (Congress) पक्षाने राहुल गांधी आणि हमाल यांच्या भेटीचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओची सध्या प्रचंड चर्चा होत आहे.

मागील काही दिवसांपासून राहुल गांधी थेट लोकांत जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधत आहेत. त्यांच्या समस्या काय आहेत हे समजून घेत आहेत. त्यांच्या पायी भारत जोडो यात्रेनंतरचा हा पुढला टप्पा असल्याचेही सांगण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी आतापर्यंत वाहनदुरुस्ती कारगीर, शेतकरी, शेतमजूर ट्रकचालक, भाजीपाला फळविक्रेते तसेच डिलिव्हरी बॉय यांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आज रेल्वेस्टेशन गाठत हमालांची भेट घेतली.

खरं तर नुकताच एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्य रेल्वे स्टेशनच्या हमाल सहकाऱ्यांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आज राहुल गांधी त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. भारत जोडो यात्रा सुरुच आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

दरम्यान, याआधी 6 मे रोजी राहुल गांधी यांनी बंगळुरूतील एका डिलिव्हरी बॉयची भेट घेतली. त्याच्या स्कूटरवरून प्रवासही केला. टमटम कामगार आणि डिलिव्हरी बॉयसोबत त्यांनी पिझ्झा देखील खाल्ला. 22 मे रोजी राहुल यांनी अंबाला ते चंदीड असा 50 किलोमीटरचा ट्रक प्रवास केला. प्रत्यक्षात ते दुपारी कारने दिल्लीहून शिमल्यासाठी निघाले होते. या काळात त्यांनी ट्रकचालकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेतले.  

Women’s Reservation : 27 वर्षांची प्रतीक्षा संपणार; लोकसभेनंतर राज्यसभेतही ‘महिला आरक्षण विधेयक’ मंजूर होणार?

27 जून रोजी राहुल गांधी दिल्लीतील एका गॅरेजमध्ये दाखल झाले. येथे काम करणाऱ्या मॅकेनिकसोबत त्यांनी स्वतः वाहन दुरुस्तीचे कामही केले. या लोकांच्या समस्या काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 7 जुलै रोजी राहुल गांधी हरियाणातील सोनिपतमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचले. येथे त्यांनी शेतात भात लावणीही केली. इतकेच नाही तर ट्रॅक्टर चालवून नांगरणी देखील केली. यावेळी त्यांनी शेतकरी आणि शेतमजुरांशी संवाद साधला. राहुल गांधी दिल्लीतील आझादपूर मंडीत पोहोचले. येथे त्यांनी भाजीपाला आणि फळांच्या वाढत्या किंमतींबाबत विक्रेत्यांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Exit mobile version