Download App

मोठी बातमी : लोकसभेत आता घमासान ! Rahul Gandhi यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसकडे लोकसभेची मोठी जबाबदारी आली असून, राहुल गांधींची विरोधी पक्षनेतेपदी निवड

  • Written By: Last Updated:

Congress MP Rahul Gandhi has been appointed as the LoP in the Lok Sabha: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला शंभर जागा मिळाल्या आहेत. इंडिया आघाडीमध्ये काँग्रेस (Congress) सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसकडे लोकसभेची मोठी जबाबदारी आली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली आहे. काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या दहा वर्षांत लोकसभेत (Lok Sabha) विरोधी पक्षनेता नव्हता. तेवढे संख्याबळ विरोधकांकडे नव्हता. यंदा काँग्रेसची कामगिरी जबरदस्त झाली आहे. तब्बल दुप्पट जागा निवडून आल्याने विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळाले आहे.

इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेते नियुक्तीवर शिक्कामोर्तब झाला आहे. या बैठकीला राहुल गांधी, टीएमसीचे डेरेक ओ ब्रायन, कल्याण बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, डीएमके के टीआर बालू, आरजेडीचे सुरेंद्र यादव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन, शिवसेनेचे अरविंद सावंत, आरएलपीचे हनुमान बेनीवाल उपस्थित होते. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना याबाबत प्रोटेम स्पीकर भर्तृहरि महताब यांना पत्र दिले असल्याची माहिती काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी जाहीर केली आहे.


दहा वर्षानंतर विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा

2014 आणि 2019 ला लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानीपत झाले होते. विरोधी पक्षनेतेपद मिळण्या इतके त्यांच्याकडे खासदारांचे संख्याबळ नव्हते. लोकसभेच्या एकूण जागांपैकी दहा टक्के जागा जिंकणाऱ्या पक्षाला विरोधीपक्षनेते पद दिले जाते. परंतु परंपरेनुसार मागील वेळी काँग्रेसकडून हे पद पश्चिम बंगालचे खासदार अधीर रंजन चौधरी यांना मिळाले होते. परंतु यंदा ते निवडणूक पराभूत झाले.


Ind vs Aus 2024 : रोहितचा ‘फेअरलेस’ खेळ अन् ‘बापू’चा मॅच फिरवणाऱ्या कॅचने केला ऑस्ट्रेलियाचा गेम

या पदावर अनेकांचे नावे चर्चेत आले होते. परंतु अखेर काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधी यांचे नाव निश्चित झाले आहे. इंडिया आघाडीचे 236 खासदार आहेत. ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसची खासदारही विरोधी बाकावर आहे. त्यामुळे सत्ताधारी एनडीए आघाडीला खिंडीत गाठण्यासाठी इंडिया आघाडीकडे संख्याबळ आहे. त्यात विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे राहुल गांधी आता आक्रमक भूमिका घेतील, याची झलक आता विशेष लोकसभेच्या अधिवेशनात दिसणार आहे.

नगरसेवक ते खासदार, सहज पदं आली नाहीत! संसदेत शपथ घेताच खासदारपुत्राची भावनिक पोस्ट

follow us