नगरसेवक ते खासदार, सहज पदं आली नाहीत! संसदेत शपथ घेताच खासदारपुत्राची भावनिक पोस्ट

नगरसेवक ते खासदार, सहज पदं आली नाहीत! संसदेत शपथ घेताच खासदारपुत्राची भावनिक पोस्ट

Nilesh Rane : देशात 18 व्या लोकसभेसाठी (Loksabha Election) पार पडलेल्या निवडणुकीत विजयी खासदारांनी लोकसभेत शपथ घेतलीयं. देशभरासह राज्यातील सर्वच खासदारांना लोकसभेचे हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी शपथ दिलीयं. रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज लोकसभेत शपथ घेतलीयं. नारायण राणे यांनी शपथ घेताच भाजप नेते निलेश राणे यांनी खासदार राणे यांच्या जीवनप्रवासाविषयी एक्सवर पोस्ट शेअर केलीयं. यामध्ये निलेश राणे यांनी नगरसेवक ते खासदारपदापर्यंतची पदे सहज आली नसल्याचं म्हटलंय.

नारायण राणे यांनी 1985 साली महापालिकेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. नगरसेवकपदी निवडून आल्यानंतर नारायण राणे यांनी 1990 साली पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत विधानसभेवर धडक मारली. त्यानंतर 2014 सालापर्यंतच्या निवडणुकांमध्ये नारायण राणे यांचा कोणीही पराभव केला नाही. सलग सहावेळा आमदार होण्याचा मान नारायण राणे यांनी मिळवला. यामध्ये मधल्या काळात 2014 ते 2024 मध्ये ते विधानपरिषेदचे आमदार राहिले. त्यानंतर राज्यसभेला खासदार आणि आज 2024 अखेर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवत खासदार होत संसदेत शपथ घेतली.

लोकसभा अध्यक्षपदासाठी पहिल्यांदाच होणार निवडणूक; इंडिया आघाडीनेही दिला तगडा उमेदवार

निलेश राणे पोस्टमध्ये म्हणाले, “१९८५ नगरसेवक, १९९० ते २०१४ सलग सहा वेळा आमदार (१ पोटनिवडणूक), २०१४ ते २०२४ विधानपरिषद १ वेळा, राज्यसभा १ वेळा आणि २०२४ आज लोकसभा खासदार. ही सगळी पदं सहज आली नाही, त्यासाठी तुम्ही किती संघर्ष केला ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही. तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथपर्यंत आलो मलाच कळलं नाही पण तुम्हाला जरी नाही कळलं तरी ते आम्हाला दिसलं. इतकी लोकं इतके वर्ष जोडून ठेवणं सोप्प नाही. जीवनात सरळ काहीच मिळत नाही हे आम्हाला समजलं. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही निलेश नितेशला सांभाळा कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला त्याला सांभाळायची गरज नाही. कोकणाने आणि खास करून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम देले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्ष जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार. तुम्ही आहात म्हणून हे सगळं शक्य आहे!” असं नितेश राणे यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केलंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज