Karnataka DK ShivaKumar: सध्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी असून, सहा टप्प्याचे मतदान झाले आहे. रविवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. निवडून येण्यासाठी उमेदवार आता देवदर्शनला जात आहे. कोणी होमहवन करून घेत आहे. त्यात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (DK ShivaKumar) यांनी अजब विधान केले आहे. अघोरी यत्र करून कर्नाटक सरकार पाडण्याचा कट करण्यात येत असल्याचे शिवकुमार यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले. परंतु आता या विधानावरून शिवकुमार हे अडचणीत येऊ शकतात. कारण ते सरकारच्या महत्त्वाच्या पदावर आहेत. त्यामुळे एकप्रकारे त्यांचे विधान वादग्रस्त आहे. (Conspiracy to topple Karnataka government by performing Aghori Yagna; Deputy CM Shivakumar’s strange claim)
हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याप्रकरण; छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा
माझ्या आणि मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात शत्रू भैरवी यज्ञ केला जात आहे, असे शिवकुमार हे म्हटले आहे. हा प्रकार भाजप (BJP) किंवा जेडीएसचे लोक करत आहेत का या प्रश्नावर शिवकुमार म्हणाले, मला माहीत आहे की हे कोण करत आहेत. ते यात तज्ञ आहेत. मला अधिक बोलायचे नाही. कारण तुम्ही (मीडिया) हा विषय इतरत्र कुठेतरी घेऊन जाल. हे लोक कोण आहेत हे देखील तुम्हाला कळेल.
माजी महापौरांवरील गोळीबार राजकीय षडयंत्र, 4 जूननंतर विरोधकांना बंदूकीच्या धाकावर…; जलील यांचा आरोप
शत्रू भैरवी यज्ञ नावाचा विधी हा अघोरी असतो. ज्यामध्ये प्राण्यांचा बळी दिला जातो. हा यज्ञ केरळमधील एका मंदिरात सुरू आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्य काँग्रेस सरकारच्या विरोधात हा यज्ञ केला जात आहे. कोणाचेही नाव न सांगता. कर्नाटकातील काही नेत्यांकडून हे काम करून घेतले जात आहे. त्यासाठी अघोरींची मदत घेतली जात असल्याचे शिवकुमार म्हणाले.
शिवकुमारने ब्रेसलेट घातले आहे. त्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, माझ्या आणि आमच्या सरकारविरुद्ध केरळमध्ये एक मोठा प्रयोग सुरू आहे. कोणीतरी मला याबद्दल लेखी माहिती दिली आहे. मला कोणीतरी सांगितले आहे की ही पूजा कुठे होत आहे आणि कोण करत आहे. माझ्या आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हा प्रकार केला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते शिवकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. यामागे राजकीय लोक आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, राजकीय लोक नाही, तर दुसरे कोण करणार? राजराजेश्वरी मंदिराजवळ जा आणि पाहा, असे आवाहनच शिवकुमारांनी पत्रकारांना केले आहे.