महाराष्ट्रातही भाजपला टेन्शन, मविआ भारी ठरणार; योगेंद्र यादवांचा युतीला 20 ते 22 जागा मिळण्याचा अंदाज
Loksabha Election Increase BJP Tension after Yogendra Yadav Forecasting : सध्या देशभरात 1 जूनला होणाऱ्या लोकसभेच्या ( Loksabha Election ) शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर लागणाऱ्या निवडणुकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. याच दरम्यान राजकारणी ते निवडणूक विश्लेषक बनलेल्या योगेंद्र यादव (Yogendra Yadav) यांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला कीती जागा मिळतील? याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे आता भाजपच्या 400 पारच्या घोषणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यावेळी यादव यांनी महाराष्ट्रात भाजपची स्थिती काय असणार? याबद्दल देखील सांगितले आहे. यादव हे ‘द वायर’ या न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
नरेंद्र मोदी हॅट्रीक करणार का? राहुल गांधींंना किती यश? ज्योतिषी मारटकर यांचं मोठ भाकीत
महाराष्ट्राबद्दल बोलताना यादव म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपबद्दलचं वातावरण पाहता हे स्पष्ट आहे की, 2019 च्या तुलनेत 2024 च्या लोकसभेत भाजप आणि महायुती महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी जागा मिळतील. गेल्यावेळी 23 एकट्याने जागा जिंकणाऱ्या भाजपच्या यावेळी महायुतीला केवळ 20-22 तर भाजपला गेल्यावेळीच्या तुलनेत 5 जागांचं नुकसान होऊ शकतं. म्हणजे यावेळी एकट्या भाजपला 18 जागा मिळतील. असा अंदाज यादवांनी वर्तवला आहे. तर मतदारांचा कौल काँग्रेसच्या महाविकास आघाडीला असेल ज्यामध्ये महाविकास आघाडीला 25 ते 26 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर एखादी जागाही इतर पक्षाला मिळू शकते. ज्यामध्ये महाराष्ट्रात एमआयएम, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष वेगळे लढत आहेत.
त्याचबरोबर भाजप आणि महायुतीच्या जागा घटण्याचं कारण देखील यावेळी योंगेंद्र यादवांनी सांगितलं. ते म्हणाले की, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये पडलेल्या फुटीमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने सहानुभूतीची लाट आहे. त्याचा भाजपला फटका आणि मविआला फायदा होऊ शकतो. तर शिंदेंच्या शिवसेनेला खरी शिवसेना कुणाची? या वादाचा फटका बसण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
कोण किती जागा जिंकणार काय म्हणाले योगेंद्र यादव?
लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपनं 400 पारचा नारा दिला आहे तर, विरोधी इंडिया आघाडी आपल्या विजयाचा दावा करत आहे. या सर्व दाव्यांमध्ये निकालापूर्वीच यादव यांनी इंडिया आघाडी एनडीएपेक्षा जास्त जागा जिंकेल असे सांगत भाजपला 250 पेक्षा कमी जागा मिळतील असे म्हटले आहे.‘सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार भाजपला 250 पेक्षा कमी जागा मिळतील असे गणित मांडत शेवटच्या टप्प्यात भाजपला उत्तर प्रदेश आणि बिहारमधून धक्का मिळू शकतो. यामुळे इंडिया आघाडी भाजपला त्रासदायक ठरण्याची चिन्हे आहेत. योगेंद्र यादव यांच्या दाव्यानुसार भाजपला 250 किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे 230 पर्यंतही असू शकतो.