Download App

यूपीमध्ये कोरोनाचा उद्रेक, 38 विद्यार्थ्यांसह 2 कर्मचारी पॉझिटिव्ह, कॅम्पस क्वारंटाईन

लखीमपूर खेरी : देशात सध्या कोरोना पुन्हा वाढताना दिसतोय. यामध्येच आता यूपीमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यातील मितौली तालुक्यातील कस्तुरबा निवासी शाळेतील तब्बल 38 विद्यार्थ्यांसह 2 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे या शाळेचा कॅम्पस क्वारंटाईन करण्यात आला आहे. तर या जिल्ह्यातील एकाच दिवसांत आढळलेली. या वर्षातील ही सर्वात जास्त रूग्णसंख्या आहे.

कस्तुरबा निवासी शाळेतील रूग्णांबद्दल लखीमपूर खेरीचे मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिसरातील रूग्णांच्या संपर्कात आलेले 92 नमुने तपासण्यासाठी देण्यात आले. या सर्व लोकांना 7 दिवस शाळेच्या कॅम्पसमध्ये क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. यातील दोन विद्यार्थ्यांना सर्दी असून बाकी सर्व जण ठीक आहेत. तर यूपीमध्ये गेल्या 10 दिवसांत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये 354 टक्के वाढ झाली आहे.

सावधान! नगर – पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव, धक्कादायक आकडेवारी आली समोर

गेल्या दोन वर्षांपूर्वी राज्यासह देशातील कानाकोपऱ्यात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात लॉकडाऊन सारखी परिस्थिती देखील उद्भवली होती. यातच कोरोना लसीकरणानंतर बाधितांचे प्रमाण कमी झाले होते. मात्र आता राज्यासाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजी लागली आहे. कारण राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागले असल्याची आकडेवारी समोर येऊ लागली आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Tags

follow us