Dehradun : उत्तराखंडमधील पिथोरागढ जिल्ह्यातील धारचुला गावात एका कामगाराचा खांद्यापासून तुटलेला हात डॉक्टरांनी सलग 5 तास शस्त्रक्रिया करुन पुन्हा बसवल्याचं समोर आलं आहे. घटना घडल्यानंतर कामगाराला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी खांद्यापासून वेगळा झालेला एक हातही या जखमी कामगारासोबत रुग्णालयात पाठवण्यात आला होता. तत्काळ शस्त्रक्रिया केल्याने डॉक्टरांनी कामगाराला अपंगत्व येण्यापासून वाचवलं आहे.
राज्यात तीन इंजिनचं नाही तर तिघडीचं सरकार; नाना पटोलेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल
नेमकं काय घडलं?
शरीफ अन्सारी असं या कामगाराचं नाव असून तो धारचुला गावातील रहिवासी आहे. मागील अनेक दिवसांपासून तो कॉंक्रीटच्या मशीनद्वारे कॉंक्रीटकरण करण्याचं काम करतो. ज्या दिवशी घटना घडली, त्या दिवशीही तो आपलं दैनंदिन काम करीत होता. काम करीत असतानाच अचानक त्याचा हात मशीमध्ये गेला, आणि हात खांद्यापासून वेगळा झाला. क्षणभर काय झालं त्याला उमगलचं नाही, मात्र, इतर कामगारांनी त्याला पाहिल्यानंतर कामगाराला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
Italy Bus Crash : भीषण अपघात! पर्यटकांना घेऊन जाणारी बस उलटली; 21 मृत्यूमुखी
रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकेला तत्काळ बोलावून जखमी शरीफसह त्याचा वेगळा झालेला हातही ओल्या स्वच्छ कपड्यात गुंडाळून, बर्फाच्या डब्यात ठेवण्यात आला आणि त्याला हेली अॅम्ब्युलन्सद्वारे एम्स येथे पाठवण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी दखल घेत त्याच्यावर उपचार सुरु केले.
पालकमंत्रीपदावरुन राष्ट्रवादीत खदखद वाढली : अजितदादा गटातील सर्व मंत्री फडणवीसांच्या भेटीला
डॉक्टरांच्या टीमने शस्त्रक्रिया करताना खराब झालेल्या रक्तवाहिन्या यशस्वीरित्या दुरुस्त केल्या आणि हाड पुन्हा जोडले. यानंतर, फ्लॅप मोबिलायझ करून सर्जिकल साइट झाकण्यात आली. यासाठी ऑप्टिकल मायक्रोस्कोप, फ्लोरोस्कोपी इत्यादींचा वापर करण्यात आला.
Asian Games 2023: भारताच्या खात्यात आणखी 7 पदके, हॉकी संघ उपांत्य फेरीत, असा होता दिवस
तुटलेल्या भागाच्या नसांचे विच्छेदन करून त्यानंतर रक्तवाहिन्या आणि शिरा दुरुस्त करून रक्ताभिसरण पुन्हा सुरू करण्यात आले. एका आठवड्यानंतर, जखम साफ करण्यासाठी दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. मुख्य रक्तवाहिनी दुरुस्त करून हाताला दररोज ड्रेसिंग केली जाते. डॉक्टरांनी शरीफवर तब्बल पाच तास शस्त्रक्रिया केली. त्यानंतर डॉक्टरांच्या संपूर्ण टीमने शरीफचा हात पुन्हा त्याच्या जागेवर बसवला.
दरम्यान, एम्स रुग्णालयाच्या ट्रॉमा विभागाचे प्रमुख डॉ. कमर आझम आणि प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. विशाल मगो यांच्या नेतृत्वाखाली शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या पथकाने तब्बल 5 तासांची अखंड शस्त्रक्रिया पूर्ण करून जखमींच्या छाटलेल्या हाताला पुन्हा जोडले. तसेच रुग्णाला अपंगत्व पासून वाचवले.