Download App

करावल नगर, मुस्तफाबाद अन् बाबरपूर.. 11 मुस्लीमबहुल मतदारसंघांत कुणाची जादू?

दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारसंघांतही भाजपा जोरदार कामगिरी करताना दिसत आहे. काही मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत. 

Delhi Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Delhi Election Results 2025) सुरू आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांची मतमोजणी सुरू असून सत्ताधारी आम आदमी पार्टीला तगडा झटका बसला आहे. तब्बल 27 वर्षांनंतर भाजप दिल्लीचं तख्त काबीज करेल असे सध्या दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार भाजपने 40 जागांवर आघाडी घेतली आहे. दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारसंघांतही आप जोरदार कामगिरी करताना दिसत आहे. काही मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आघाडीवर आहेत.

दिल्लीत जवळपास 11 विधानसभा मतदारसंघांत मु्स्लीम समाजाचं प्राबल्य आहे. या मतदारसंघांत मुस्लीम मतदार निर्णायक भूमिकेत आहेत. ताज्या आकडेवारीनुसार 11 मुस्लीमबहुल मतदारसंघांपैकी 8 मतदारसंघांत आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. या मतदारसंघांत काँग्रेसचेही उमेदवार आहेत. परंतु, मुस्लीम मतदारांनी पुन्हा एकदा आम आदमी पार्टीच्याच पारड्यात वजन टाकल्याचं दिसत आहे.

Delhi Election Results LIVE : दिल्लीत चित्र पालटतंय, भाजपाची आघाडी घटली, ‘आप’ची कडवी टक्कर..

बाबरपूर, बल्लीमारान, चांदनी चौक, गांधीनगर, करावल नगर, किराडी, मटिया महल, मुस्तफाबाद, ओखला, सीलमपूर, आणि सीमापूर या अकरा पैकी आठ मतदारसंघात आम आदमी पार्टीने आघाडी घेतली आहे. बाबरपूर, बल्लीमारान, चांदनी चौक, किराडी, मटिया महल, सीलमपूर आणि सीमापुरी या मतदारसंघांत आम आदमी पक्षाचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर करावल नगरमधून भारतीय जनता पार्टीचे कपिल मिश्रा, ओखलातून मनिष चौधरी, मुस्तफाबादमध्ये मोहन सिंह बिष्ट आणि गांधीनगर मतदारसंघात अरविंदर सिंह लवली सध्या आघाडीवर आहेत.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एकूण 70 जागांसाठी बुधवार (5 फेब्रुवारी) मतदान पार पडले होते. त्यानंतर हाती आलेल्या एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये 37 ते 40 जागांसह भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर एक्झिट पोलच्या आकड्यांवर आमचा विश्वास नाही. दिल्लीत आम आदमी पक्षच सरकार स्थापन करणार असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे निकालात काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. बहुतांश एक्झिट पोल्समध्ये दिल्लीत तब्बल 27 वर्षांनंतर भाजप सरकार स्थापन करणार असल्याचा दावा करण्यात आला होता.

Delhi Elections Result: केजरीवाल अडचणीत? ACB ने बजावली नोटीस, विचारले ‘हे’ 5 प्रश्न

follow us