Download App

केजरीवालांना ईडीचे सहावे समन्स, १९ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश

  • Written By: Last Updated:

ED Summons To Arvind Kejriwal : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना आणखी एक समन्स पाठवलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने (ED) केजरीवाल यांना सहावे समन्स बजावलं. ईडीने त्यांना १९ फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

आयारामांना उमेदवारी अन् निष्ठावंतांनी सतरंज्याच उचलाव्या; नाना पटोलेंचा हल्लाबोल 

ईडीने दिलल्या माहितीनुसार, नवीन अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांना पाच समन्स पाठवण्यात आले आहेत, परंतु आतापर्यंत त्यांनी या समन्सला योग्य प्रतिसाद दिलेला नाही. केजरीवाल अद्याप चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. त्यामुळं 7 फेब्रुवारी रोजी ईडीने या प्रकरणी राऊस एव्हेन्यू न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने सुनावणी केली. तसेच केजरीवाल यांना हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.न्यायालयानेच केजरीवाल यांना 17 फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितले आहे.

Avneet Kaur : अवनीत कौरचा बोल्ड अवतार पाहून इंटरनेटवरचं तापमान वाढलं 

तर आता पुन्हा एकदा ईडीने केजरीवाल यांना समन्स पाठवले. ईडीने केजरीवाल यांना 19 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांना कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी सहावे समन्स बजावले आहे, अशी माहिती बुधवारी सूत्रांनी दिली. के

नेमका आरोप काय?
दरम्यान, ईडीने दावा केला होता की ‘आप’ने गोवा निवडणूक प्रचारात सुमारे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या ‘गुन्ह्यातील रक्कम’ वापरली. याशिवाय, दिल्ली सरकारच्या 2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरणाने मद्य व्यापाऱ्यांना परवाने जारी करण्यासाी कार्टलायझेशला परवानगी दिला. आणि त्यासाठी लाच दिल्याचा आरोप असलेल्या काही डीलर्सना अनुकूलता दिली.

यापूर्वी केजरीवाल यांना यावर्षी 2 फेब्रुवारी, 18 जानेवारी आणि 3 जानेवारी आणि 2023 मध्ये 21 डिसेंबर आणि 2 नोव्हेंबरला बोलावण्यात आले होते. पण नियोजित दौऱ्यांचा हवाला देत ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यास त्यांनी नकार दिला. मात्र यावेळी ते हजर न झाल्यास त्यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांच्या लक्षं लागलं आहे.

follow us