Delhi Crime : भारतात सध्या कोणत्याही राज्यात सगळ्यात जास्त काय घडत असेल तर तरुणाचा तरुणीकडून खून तर तरुणाकडून तरुणीचा खून. त्यापाठोबाठ रोज बलात्काराच्या घटनाही काही कमी नाहीत. (Delhi Crime) आज दिल्लीतून अशी घटना समोर आली आहे. येथे प्रियकराने २२ वर्षांच्या तरुणीची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकून दिल्याची ही घटना आहे.
डीसीपी अंकित सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅब ड्रायव्हर असलेला आसिफ कोमलचा मित्र होता. पण त्याला तिच्यावर संशय होता. त्यामुळे रागाच्या भरात त्याने जुबैरसोबत मिळून तिची हत्या केली. कारमध्येच तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह नाल्यात फेकून दिला. आरोपींनी पोलिसांना सांगितलं की, कोमलची हत्या केल्यानंतर तिचे हात पाय दोरीनं बांधले. मृतदेह पाण्यात बुडावा म्हणून दगडाचा वापर केला आणि नाल्यात फेकून दिला.
पैशावरून वाद प्रेयसीचं शिर धडावेगळं केलं, अहिल्यानगरमध्ये धक्कादायक घडलं
तरुणी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी बराच शोध घेतला पण न सापडल्यानं शेवटी पोलिसात तक्रार दाखल केली होती. दिल्लीतून १२ मार्चला ती बेपत्ता झाली होती. तिच्या घरापासून ४० किमी अंतरावर एका नाल्यात मृतदेह सापडला होता. या प्रकरणी पोलिसांनी आसिफ आणि जुबैर यांना अटक केली असून तरुणीचं नाव कोमल असल्याचं समोर आलंय.
छावला पोलीस ठाण्यात १७ मार्च रोजी एक कॉल आला. त्यात नाल्यात मृतदेह असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. फॉरेन्सिक पथकाने तपास केल्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितले की, तपासावेळी आम्हाला कोमल नावाची मुलगी बेपत्ता झाल्याचं समजलं.
कोमलच्या कुटुंबियांनी तिची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. पोलिसांनी आरोपी आसिफ आणि त्याचा सहकारी जुबैरला अटक केली. आसिफ कोमलला लग्नासाठी दबाव टाकत होता. ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असल्याचं आसिफला समजलं तेव्हा तो भडकला. दोघेही एकमेकांना चार वर्षांपासून ओळखत होते. कोमल १२ मार्चला तिच्या ऑफिसमधून घरी जायला निघाली होती. ती सायंकाळी ७ वाजेपर्यंत घरी परतली नाही तेव्हा रात्री ९ वाजता कुटुंबिय पोलिसात गेले. तोपर्यंत तिचा फोनही लागत नव्हता. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा ती एका पांढऱ्या कारमधून गेल्याचं समोर आलं होतं.