पैशावरून वाद… प्रेयसीचं शिर धडावेगळं केलं, अहिल्यानगरमध्ये धक्कादायक घडलं

Man Killed Girlfriend Surrenders In Police Station : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात एका व्यक्तीने प्रेयसीचा खून केल्याची घटना घडली. त्यानंतर त्याने स्वत:चं पोलीस ठाण्यात जावून हत्येची कबुली दिल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे प्रेमी युगुल पुणे जिल्ह्यातील असल्याचं समोर (Man Killed Girlfriend) येतंय. ते फिरण्यासाठी राहुरीला गेले होते. तेथेच दोघांमध्ये वाद (Girlfriend) झाला अन् ही धक्कादायक घटना घडली.
प्रेयसीच्या जाचाला कंटाळून प्रियकराने तिचा खून करत शीर धडावेगळे केलंय. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी गावाच्या शिवारात पंचमुखी महादेव मंदिर परिसरात बुधवारी 19 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास उघडकीस (Ahilyanagar Crime) आली. याबाबत राहुरी पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतलं आहे. राहुरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी कोणी केली? खासदार कोल्हेंनी थेट पुरावेच आणले
सखाराम धोंडीबा वालकोळी (वय.53, रा. निरगुडसर, आंबेगाव,पुणे), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव (Ahilyanagar News) आहे. सोनाली राजू जाधव (वय 28, रा. पोखरी, ता.आंबेगाव, जि. पुणे) असे मयत महिलेचे नाव आहे. संशयित आरोपी वालकोळी याचे महिलेशी प्रेमसंबंध होते. प्रेयसीच्या जाचाला कंटाळून खून केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय.
सखाराम आणि सोनाली फिरण्यासाठी गेले होते. तिथे गेल्यावर त्यांच्यात पैशावरून वाद झाले. रागाच्या भरात प्रियकराने प्रेयसीवर कोयत्याने सपासप वार केले. त्यानं तिचं शिर धडावेगळं केलंय. सोनालीने तिच्या प्रियकराकडे पैशाची मागणी केली होती. पैसे दे नाहीतर मी पोलिसांत तक्रार करीन, असे तिने सखारामला धमकावले होते. त्यामुळे त्यांच्यात भांडण झालं. रागाच्या भरात सखारामने सोनालीवर वार केले.
धक्कादायक! पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या जेवणात आढळल्या अळ्या, विद्यार्थ्यांमध्ये संताप
सोनाली हत्या केल्यानंतर तिचा प्रियकर सखाराम 4 किमी चालत वांबोरी पोलिसामध्ये पोहचला. त्याने स्वत:हून पोलिसांसमोर प्रेयसीची हत्या केल्याचं कबुल केलं. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला अन् पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी सखारामला देखील ताब्यात घेतलंय.