Delhi High Court Slams Baba Ramdev On Sharbat Jihad : योग गुरू बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या शरबत जिहाद (Sharbat Jihad) वक्तव्यावर आज सुनावणी पार पडली. यावेळी बाबा रामदेव यांच्या वकिलानी सांगितलं की, सरबत जिहादचा व्हिडिओ सर्व प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात येईल. दिल्ली न्यायालयाने पाच दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश पतंजलीला दिले आहेत. सुनावणी दरम्यान न्यायालयाने (Delhi High Court) फटकारलं. न्यायाधिशांनी म्हटलंय की, व्हिडिओ बघून डोळे अन् कानांवर विश्वास बसत नाही.
‘मी याबाबत त्यांच्याशी बोललो….’ उद्धव – राज ठाकरे एकत्र येण्यावर शरद पवार काय म्हणाले?
मागील काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये म्हटलं होतं की, एक कंपनी आहे. जी सरबतच्या कमाईतून मिळणाऱ्या पैशातून मस्जिद अन् मदरसे बनवतात. लव्ह जिहाद अन् वोट जिहादसारखं सरबत जिहाद देखील सुरू आहे, असा दावा या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला होता. रामदेव बाबा यांच्या याच व्हिडिओविरोधात सरबत बनवणारी कंपनी रूआवजाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
हमदर्द कंपनी आणि तिचे उत्पादन रूह अफजा यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने योगगुरू बाबा रामदेव यांना फटकारले आहे. न्यायालयाने म्हटलंय की, बाबा रामदेव यांच्याकडे याचा कोणताही बचाव नाही. त्यांच् या विधानाने न्यायालयाच्या विवेकाला धक्का बसला आहे. दरम्यान, बाबा रामदेव यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, शरबत जिहादचा व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकण्यात येणार आहे.
साऊथ सुपरस्टार महेश बाबूला ईडीची नोटीस; मनी लाँड्रिंग प्रकरणाचं कनेक्शन काय?
खरं तर, बाबा रामदेव यांनी अलिकडेच दावा केला होता की, हमदर्द कंपनी मशिदी आणि मदरशांच्या बांधकामासाठी आपला नफा वापरत आहे. या टिप्पण्या बदनामीकारक असल्याचे सांगत हमदर्दने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात हमदर्दची बाजू वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी मांडली. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले की, ‘हा एक धक्कादायक खटला आहे. तो केवळ रूह अफजाची बदनामी करण्याचाच नाही तर ‘सांप्रदायिक विभाजनाचा’ देखील आहे. त्यांनी बाबा रामदेव यांचे विधान द्वेषपूर्ण भाषणासारखे असल्याचं म्हटलं.
बाबा रामदेव काय म्हणाले?
बाबा रामदेव म्हणाले होते, ‘जर तुम्ही ते सरबत प्याल तर मदरसे आणि मशिदी बांधल्या जातील. पण जर तुम्ही हे (पतंजलीचे गुलाबाचे सरबत) प्यायले तर गुरुकुल बांधले जातील, आचार्य कुलम विकसित होतील, पतंजली विद्यापीठाचा विस्तार होईल आणि भारतीय शिक्षण मंडळाची प्रगती होईल. यासोबतच बाबा रामदेव यांनी रूह अफजा शरबतचा संबंध लव्ह जिहादच्या कथित कटाशी जोडला होता.’जसा लव्ह जिहाद आहे, तसाच हा देखील एक प्रकारचा शरबत जिहाद आहे.’ या शरबत जिहादपासून स्वतःला वाचवण्यासाठी हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे, असं बाबा रामदेव यांनी म्हटलं होतं.