Delhi Murder : प्रेयसीला 40 वेळा भोसकून संपवणाऱ्या साहिलच्या मुसक्या आवळल्या…

Delhi Murder : दिल्लीतल्या रोहिणी भागात प्रेयसीवर 40 वार करुन दगडाने ठेचणाऱ्या प्रियकराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी साहिलला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातून अटक केली आहे. दरम्यान, यासंदर्भात माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे. Minor girl murder in Delhi: Accused arrested near UP's Bulandshahr Read @ANI Story | https://t.co/RGAGoIaEq4#DelhiMurder #ShahbadDairy #DelhiPolice pic.twitter.com/IFzynZxvNV — ANI Digital […]

Delhi Murder

Delhi Murder

Delhi Murder : दिल्लीतल्या रोहिणी भागात प्रेयसीवर 40 वार करुन दगडाने ठेचणाऱ्या प्रियकराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी साहिलला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातून अटक केली आहे. दरम्यान, यासंदर्भात माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

चिंता वाढली, चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, जूनअखेर पुन्हा येणार कोरोनाची लाट

पोलिसांच्या माहितीनूसार, एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं साहिलशी प्रेमसंबंध सुरु होते. मात्र, साहिलच्या दोन बहिणींचा या प्रेमसंबंधाला विरोध होता. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विषय सोडून दे, असा सल्ला नेहमीच दोन्ही बहिणी साहिलला देत होत्या. मात्र, बहिणीच्या सल्ला झुगारुन साहिल आणि अल्पवयीन मुलगी दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. तब्बल दोन वर्षांपासून ते दोघे लिव्ह-इनमध्ये होते.

‘The Kerala Story’ला प्रपोगंडा सिनेमा म्हणाऱ्यांना दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी सुनावलं

हे प्रेम प्रकरण सुरु असतानाच साहिलच्या दोन्ही बहिणींनी साहिला तु जितक्या लवकर मुलीपासून दूर होशील तितके स्वत:सह कुटुंबियांसाठी चांगलं होणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, साहिलने कुटुंबियांचं न ऐकता मुलीशी प्रेमसंबंध सुरुच ठेवलं होतं.

IPL 2023 Final CSK vs GT : IPL च्या अंतिम सामन्यावर पावसाने फिरवले पाणी, राखीव दिवशी होणार सामना

त्यानतंर अखेर दोघांमध्ये झालेल्या वादाचा शेवट झाला. प्रेयसी एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जात असतानाच भर रस्त्यात साहिलने तिच्यावर चाकूने तब्बल 40 वार केल्यानंतर त्याने तिला दगडाने ठेचून संपवले आहे. ही चित्त थरारक घटना सीसीटीव्हीमध्येही कैद झाली आहे.

जमालगोट्यावरून अजितदादांचे शिंदेंना खडेबोल! म्हणाले, सुंसस्कृत महाराष्ट्रात…

कोण आहे साहिल?
साहिल स्वत: एक फ्रीज मेकॅनिक असून वडील सर्फराज यांचा वेल्डिंगचा व्यवसाय आहे. कुटुंबात दोन बहिणी असून साहिल हा एकुलता एक भाऊ आहे.

दरम्यान, दिल्लीतल्या गर्दीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर आरोपी साहिलला पोलिसांनी अटक केली आहे.

Exit mobile version