जमालगोट्यावरून अजितदादांचे शिंदेंना खडेबोल! म्हणाले, सुंसस्कृत महाराष्ट्रात…
Ajit Pawar replies Eknath Shinde : देशाच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन (New Parliament Building) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. या संसद भवनावरुन बरेच वाद पाहण्यास मिळाले. अनेक विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल घणाघाती टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले.
संसद भवन उद्घाटनाला विरोध करणाऱ्या विरोधकांवर टीका करताना शिंदे म्हणाले होते, की काही विघ्नसंतोषी लोक असतात. अशा कार्यक्रमाला विरोध करणे हा लोकशाहीचा अपमान आहे. त्यांचा विरोध लोकशाहीला आहे की पंतप्रधान मोदींना हे त्यांनी सांगावे. त्यांनी ही जी काही पोटदुखी सुटली आहे. जनता सूज्ञ आहे. त्यामुळे जनता त्यांच्या पोटदुखीला चांगला जमालगोटा देऊन त्यांची पोटदुखी दूर करेल.
Sharad Pawar : संसद भवनाच्या उद्घाटनाच्या नावाखाली कर्मकांड; बरं झालं मी उद्घाटनाला गेलो नाही
शिंदे यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेसंदर्भात प्रसारमाध्यमांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला. ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. पण यशवंतराव चव्हाणांनी तेव्हा सुसंस्कृत महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी, बाकीच्या मान्यवरांनी कसं बोलायचं असतं याचे काही संस्कार आपल्यावर केले आहेत. पण, हे जमालगोटा वगैरे शब्द मुख्यमंत्र्यांना तरी पटतात का?, असा सवाल पवार यांनी केला.
शिंदेंनी केला पुनरुच्चार
एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीतील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांच्या या विधानाचा पुनरुच्चार केला. आपल्या भाषणात विरोधकांवर टीका करताना शिंदे म्हणाले, मी काल म्हटले होतेच ज्या लोकांना पोटदुखी झाली आहे त्यांना या देशातील जनता जमालगोटा देईलच. त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात जोरदार हास्यकल्लोळ उडाला.
पुण्यात राष्ट्रवादीचीच ताकद, अजित पवारांनी काँग्रेसच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळले !