Sharad Pawar : संसद भवनाच्या उद्घाटनाच्या नावाखाली कर्मकांड; बरं झालं मी उद्घाटनाला गेलो नाही
Sharad Pawar said Ritual in the name of inauguration of Parliament House; Well, I didn’t go to the event : आज नवीन संसद भवनाचा (New Parliament Building) उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या नवीन इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते झाले. या सोहळ्यादरम्यान, दिल्लीत मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पूजा आणि हवन केल्यानंतर नरेंद्र मोदींनी सेंगोलची पूजाही केली. पीएम मोदींनी सेंगोलच्या राजदंडपुढे नतमस्तक होऊन उपस्थित संतांचे आशीर्वादही घेतले. वैदिक मंत्रोच्चारांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. संसदेबाबत निर्णय घेतांना विरोधकांशी चर्चा झाली नाही. नवीन संसदेत उद्घाटनाच्या नावाखाली केवळ कर्मकांड केलं, असा घणाघात त्यांनी केला.
शरद पवार म्हणाले की, मी आज सकाळी टीव्हीवर नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पाहिला. त्यानंतर मी तिथं गेलोच नाही, हे बरचं झालं असं मला वाटलं. कारण, तिथं जे काही कर्मकांड सुरू होतं, त्यावरून नेहरूंनी आधुनिक विज्ञानाच्या आधारावर राष्ट्राची उभारणी करण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं, त्याला तिलांजली दिली. त्यामुळं पुन्हा एकदा आपण काही वर्ष पाठीमागे जातो की काय? असं वाटायला लागलं.
New Parliament Building : संसदेच्या बांधकामात महाराष्ट्र, गुजरातचे खास योगदान, वाचा स्पेशल फॅक्ट्स
पवार म्हणाले, देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांना या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला हवं होतं. कारण, संसदेच्या कोणत्याही कामाची सुरूवात राष्ट्रपतीच्या हस्ते होते. लोकसभेचे प्रमुख त्या कार्यक्रमाला दिसले. मात्र, राज्यसभेचे प्रमुख या कार्यक्रमात कुठंही दिसले नाही. त्यामुळं हा कार्यक्रम ठराविक लोकांसाठीच होता की, काय असं वाटालया लागलं, असा टोलाही त्यांनी लगावला.
देशात लोकशाहीच्या विरोधात सर्व सुरू आहे. नवीन संसद भवनाच्या बाबतीत निर्णय घेतांना विरोधकांशी कोणतीही चर्चा झाली नाही, दरम्यान, जे जुनं पार्लंमेंट आहे, त्याच्याशीच आमची बांधिलकी आहे. आपण संसदेच्या उद्घाट कार्यक्रमाला का गेला नाही, असं पवारांना विचारलं असता ते म्हणाले की, नवीन संसदे भवनाच्या उद्घाटनाचे निमंत्रण माझ्या हातात आलं नाही, असं पवार म्हणाले.