Download App

Delhi Pollution : राजधानी दिल्लीत धुराचं साम्राज्य; वाहने, शाळांसह लाकूड जाळण्यावर बंदी…

Delhi Pollution : गेल्या काही दिवसांपासून दिल्लीसह देशभरात प्रदुषणाचं सावट(Delhi Pollution) आहे. हवा दुषित झाल्याने राजधानी दिल्लीत अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. दिल्लीत वाहनांना बंदीसह शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. एवढचं नाही तर लाकूड जाळण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. पुढील आदेशापर्यंत दिल्लीकरांना आत ग्रेप – 4 च्या निर्बंधांना सामोरं जावं लागणार आहे. दिल्लीत वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर अॅंडी डस्ट मोहिम 15 दिवसांसाठी वाढवण्यात आलीयं. यांसदर्भात माहिती पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी दिली आहे.

Maratha Reservation आंदोलनात बीडमध्ये जाळपोळ करणाऱ्या 181 जणांना बेड्या; ऐन दिवाळीत पोलिसांची कारवाई

गोपाल राय म्हणाले की, सीएक्यूएमच्या पुढील बैठकीपर्यंत जीआरपीच्या ग्रेप-4 चे निर्बंध दिल्लीत सुरू राहणार आहेत. या काळात ‘बीएस-3 पेट्रोल आणि बीएस-4 डिझेल वाहनांवर बंदी असणार आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्‍या ट्रक वगळता इतर ट्रकवरही बंदी असणार आहे. मात्र, सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांना या बंदीतून सूट देण्यात आल्याचं राय यांनी स्पष्ट केलं आहे.

Aishwarya Deepfake Video: रश्मिका अन् सारापाठोपाठ ऐश्वर्या राय डीप फेकच्या जाळ्यात!

दिल्लीतील सर्व प्रकारच्या बांधकामांवर बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 18 तारखेपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णयही कायम राहणार आहे. 13 हॉट स्पॉट्सवर कडक नजर ठेवली जाणार असूनअँडी डस्ट मोहीम 7 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आली. ही मोहिम 15 दिवसांसाठी वाढवली असून 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

World Cup : 32 वर्षांपूर्वी जिथे मिळाली नवसंजीवनी तिथेच ऐतिहासिक संधी : आफ्रिकेकडे जगाचे लक्ष

दिल्लीत वाढत असलेल्या प्रदुषणामुळे लाकूड जाळण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासाठी 611 पथके तैनात करण्यात आले आहेत. दिल्लीतील जनतेला ‘ग्रीन दिल्ली अॅप’ डाउनलोड करण्याचे आवाहन केले आणि अशा प्रकारचा उपक्रम दिसल्यास वॉर रूमला कळवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.

Lok Sabha Election : ‘एक दिवस पंतप्रधानपदी विराजमान होऊ’; भाजपाच्या जुन्या मित्राचं चॅलेंजिंग वक्तव्य

प्रदुषणाची पातळीत 215-20 पर्यंत :
दिल्लीतील प्रदूषणाची पातळी 215-20 पर्यंत पोहोचली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये रात्रीच्या वेळी फटाके फोडण्यात आल्याने प्रदूषणाची पातळी 315-20 पर्यंत वाढली. फटाक्यांसाठी त्यांनी यूपी आणि हरियाणा सरकारलाही जबाबदार धरले आहे. दिल्लीमध्ये फटाक्यांची निर्मिती, साठवणूक आणि विक्रीवर बंदी होती, पण जाळलेले फटाके उत्तर प्रदेश आणि हरियाणामधून आले होते.

Tags

follow us