Dhirendra Shastri On Ranveer Allahabadia : प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला (Ranveer Allahabadia) सध्या प्रचंड ट्रोल होतोय. समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंटमध्ये त्याने एका स्पर्धकाशी बोलताना आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्याच्या या विधानानंतर आता मोठा वाद निर्माण झालाय. दरम्यान, आता रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनाच्या व्हिडिओवर बागेश्वर धामचे महंत धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांनी संताप केला.
IND vs ENG 3rd ODI : भारताचा धमाकेदार विजय, 142 धावांनी पराभव करत इंग्लंडचा केला व्हाईटवॉश
रणवीर अलाहाबादिया आणि समय रैनाने यांनी जे केलंय, ते खूपच चिंताजनक आहे. ते इतकं घाणेरडं आहे की, बोलणंही अवघड आहे. त्यांना माफ करायला नको तर मनातून आणि हृदयातून काढून टाकलं पाहिजे, असं ते म्हणाले.
धीरेंद्र शास्त्री म्हणाले, देशाच्या सनातन संस्कृतीशी जे खेळ करत आहेत, असे लोक निश्चितपणे निर्दयी आहेत. सरकारने अशा लोकांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. या दोघांनी खूप घाणेरड्या गोष्टी बोलल्या आहेत. अशा लोकांना माफ करू नका, त्यांना मनातून काढून टाका, असं ते म्हणाले.
पुढं ते म्हणाले, आम्ही लोकांना कायम सांगत असतो की, एखादा व्यक्ती कसा आहे, हे आधी जाणून घ्या. त्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवा. मात्र, या दोघांना माफ करण्याचा प्रश्न यते नाही. या दोघांनी खूप घाणेरड्या गोष्टी बोलल्या आहेत. ज्या ऐकणंही कठीण आहे. त्यामुळं अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
रणवीर अलाहाबादिया नेमकं काय म्हणाला?
‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या नवीनतम भागात रणवीर अलाबादिया, आशिष चंचलानी आणि अपूर्वा मुखिजा यांनी हजेरी लावली होती. यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला आई वडिलांच्या प्रायव्हसीबद्दल आक्षेपार्ह प्रश्न विचारला. रणवीरने शोमधील एका स्पर्धकाला तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की, तुला त्यांच्यासोबत सामील होऊन ते कायमचे थांबवायला आवडेल? असा प्रश्न विचारला. यापैकी कोणताही एक पर्याय निवडायला रणवीरनं सांगितलं होतं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.
समय रैनाचे दोन शो रद्द
रणवीर अलाहाबादियाच्या शोमुळे समय रैना देखील वादात सापडला आहे. त्याचे दोन शो गुजरातमध्ये होणार होते. ते रद्द करण्यात आलेत. समय रैनाचा अहमदाबाद आणि सुरत येथे कार्यक्रम होणार होता. मात्र, वाद निर्माण झाल्यामुळे दोन्ही शो रद्द करण्यात आले आहेत. हे शो १७ मार्च आणि २७ एप्रिल रोजी होणार होते