IND vs ENG 3rd ODI : भारताचा धमाकेदार विजय, 142 धावांनी पराभव करत इंग्लंडचा केला व्हाईटवॉश
![IND vs ENG 3rd ODI : भारताचा धमाकेदार विजय, 142 धावांनी पराभव करत इंग्लंडचा केला व्हाईटवॉश IND vs ENG 3rd ODI : भारताचा धमाकेदार विजय, 142 धावांनी पराभव करत इंग्लंडचा केला व्हाईटवॉश](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/IND-vs-ENG-3rd-ODI_V_jpg--1280x720-4g.webp)
IND vs ENG 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs ENG 3rd ODI) भारतीय संघाने धमाकेदार कामगिरी करत इंग्लंडचा 142 धावांनी पराभव केला आहे. याचबरोबर भारताने या मालिकेत 3-0 ने विजय मिळवत इंग्लंडचा व्हाईटवॉश केला आहे. या सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill) शानदार कामगिरी करत एकदिवसीय सामन्यात सातवे शतक झळकावले.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) 357 धावांचे लक्ष्य इंग्लंडला दिले होते. ज्याला प्रत्युत्तर म्हणून इंग्लंडचा संघ 34.2 षटकांत 214 धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडकडून टॉम बँटन आणि गस अॅटकिन्सन यांनी38-38 धावा केल्या. बेन डकेटने 34 आणि फिल सॉल्टने 23 धावा केल्या. हॅरी ब्रुकने 19 धावा केल्या. तर इंग्लंडचे चार खेळाडू दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत, ज्यात कर्णधार जोस बटलर (6) आणि लियाम लिव्हिंगस्टोन (9) यांचा समावेश आहे. भारताकडून अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Captain @ImRo45 is presented the winners trophy by ICC Chairman, Mr @JayShah as #TeamIndia clean sweep the ODI series 3-0 👏👏
#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/1XaKksydw9
— BCCI (@BCCI) February 12, 2025
तर दुसरीकडे नाणेफेक गमावल्यानंतर भारताने निर्धारित 50 षटकांत सर्वबाद होऊन 356 धावा केल्या. सलामीवीर शुभमन गिलने त्याचे सातवे एकदिवसीय शतक झळकावले. त्याने 102 चेंडूत 14 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 112 धावांची खेळी केली. विराट कोहली (52) आणि श्रेयस अय्यर (78) यांनी अर्धशतके झळकावली. कोहलीने 55 चेंडूंचा सामना केल्यानंतर 7 चौकार आणि एक षटकार मारला. त्याच वेळी, अय्यरने 64 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. गिलने कोहलीसोबत 116 धावांची आणि अय्यरसोबत 104 धावांची भागीदारी केली. केएल राहुलने 40 धावा केल्या.
महाराष्ट्रात काँग्रेसची कमान कोणाकडे? अध्यक्षपदासाठी ‘या’ नावांची चर्चा
हार्दिक पंड्याने 17 धावांचे योगदान दिले, वॉशिंग्टन सुंदरने 14 धावांचे योगदान दिले आणि अक्षर पटेलने 13 धावांचे योगदान दिले. कर्णधार रोहित शर्माला फक्त 1 धाव करता आल्या. इंग्लंडकडून फिरकी गोलंदाज आदिल रशीदने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मार्क वुडीने दोन तर साकिब महमूद, जो रूट आणि गस अॅटकिन्सन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.