Air India ची मोठी कारवाई, गांजा प्रकरणानंतर सर्व वैमानिकांसाठी ‘डोप टेस्ट’ अनिवार्य

Air India Flight : फुकेट - दिल्ली फ्लाइट प्रकरणानंतर एअर इंडियाने मोठा निर्णय घेत आता सर्व वैमानिकांसाठी 'डोप टेस्ट' अनिवार्य केला आहे.

Air India

Air India

Air India Flight : फुकेट – दिल्ली फ्लाइट प्रकरणानंतर एअर इंडियाने मोठा निर्णय घेत आता सर्व वैमानिकांसाठी ‘डोप टेस्ट’ अनिवार्य केला आहे. फुकेटहुन दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइटच्या पायलटची कॅनाबिस टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एअर इंडियाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि विश्वास टिकवून ठेवण्यासाठी, एअर इंडियाने आजपासून (13ऑगस्ट) आपल्या समूहातील सर्व वैमानिकांसाठी (पायलट्स) अनिवार्य ‘डोप टेस्ट’ (अमली पदार्थांच्या सेवनाची चाचणी) सुरू केली असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या चाचण्या गुरुग्राम अकादमीमधील प्रशिक्षणादरम्यान, फ्लाइट ब्रीफिंग सेंटर्सवर (विमानफेरीनंतर) आणि एअर इंडियाच्या बेस लोकेशन्सवर (मुख्यालय/तळांवर) घेतल्या जातील.कोणताही वैमानिक प्रतिबंधित पदार्थ किंवा विमान वाहतूक नियमांनुसार निषिद्ध असलेली औषधे घेत आहे का, हे तपासणे हा या चाचणी प्रक्रियेचा उद्देश आहे.

या निर्णयापूर्वी नियम काय होते?

तर दुसरीकडे यापूर्वी एअर इंडियाकडून (Air India Flight) प्रत्येक फ्लाइटपूर्वी सर्व वैमानिकांची अनिवार्य ब्रेथ ॲनालायझर’ चाचणी (मद्यपानाची चाचणी) केली जात होती ही पद्धत यापूढेही सुरु राहणार असल्याची माहिती एअर इंडियाकडून देण्यात आली आहे.

ड्रग/डोप टेस्ट (पूर्वीचा नियम)

डीजीसीएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विमान कंपन्या केवळ 5% ते 10% वैमानिकांची ‘रँडम’ डोप चाचणी करत असत, किंवा एखादी घटना घडल्यानंतर किंवा संशय आल्यावरच चाचणी केली जात असे. परिणामी, संपूर्ण वैमानिक कर्मचाऱ्यांऐवजी केवळ काही वैमानिकांचीच चाचणी केली जात असे.

नवीन बदल काय आहे?

‘रँडम’ तपासणीऐवजी, एअर इंडियाने आपल्या सर्व वैमानिकांसाठी अनिवार्य डोप स्क्रीनिंगचे आदेश दिले आहेत. प्रवाशांचा विश्वास जपण्यासाठी डीजीसीएने निश्चित केलेल्या किमान मानकांपेक्षाही पुढे जाऊन हे पाऊल उचलल्याचे एअर इंडियाचे म्हणणे आहे.

‘वर्षा’ वर आंदोलन करणार; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

निर्णय का?

4 ऑगस्ट रोजी एअर इंडियाचे विमान AI-2379 हे 137  प्रवासी आणि 8 क्रू सदस्यांसह फुकेतवरून दिल्लीला येत असताना अचानक 300 फूट खाली आले. या धक्क्यामुळे 20 प्रवासी आणि 4 क्रू सदस्य जखमी झाले. त्यानंतरच्या तपासात असे निष्पन्न झाले की, मुख्य वैमानिकाने (पायलट-इन-कमांड) गांजाचे सेवन केले होते. सहा दिवसांनंतर, 11 ऑगस्ट रोजी, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांनी विमान कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नागरी उड्डाण सचिव समीर कुमार सिन्हा आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर, विमान कंपनीने आपल्या सर्व वैमानिकांसाठी अनिवार्य चाचणी लागू करण्याचा निर्णय घेतला.

Exit mobile version