Draupadi Murmu : देशाच्या पहिल्या नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ( Draupadi Murmu ) यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी मुलाखत घेतली. भारत सरकारच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकरची मुलाखत घेण्यात आली. भारतीय राजकारणातील दोन दिग्गज महिलांच्या अनोख्या गप्पा या मुलाखतीत पाहायला मिळाल्या.
गुरूजनांसाठी राज मैदानात! निवडणुकांच्या रणधुमाळीपूर्वीच ठाकरेंनी घेतला आयोगाशी पंगा
राजकारण आणि अनेक सामाजिक विषयाच्या पलिकडे जाऊन या गप्पा भारतीय राजकारणासाठी खरंच खास आहे यात शंका नाही. यामध्ये राष्ट्रपती मुर्मू यांनी त्यांच्या लहानपणाच्या गोष्टींपासून ते अध्यक्षीय कर्तव्यापर्यंत अनेक गोष्टींवर विस्तृतपणे बोलल्या. त्यांनी राजकीय प्रवासाची अनोखी गोष्ट यातून उलगडली आहे. स्मृती इराणी आणि राष्ट्रपती मुर्मू यांची ही मुलाखत नक्कीच विविध विषयावर भाष्य करणारी ठरणारी आहे.
भाजपसोबत युती करणार का? प्रश्न विचारताच राज म्हणाले माझा विषय वेगळाय….
स्मृती इराणी यांची सकारात्मक बाजू सामाजिक बदलाची जाणीव यातून दिसून आली आहे. स्मृती इराणी यांनी संपूर्ण मुलाखतीदरम्यान राष्ट्रपतींना त्यांनी त्यांचं कुटुंब गमावल्याच्या दु:ख आणि नैराश्यातून झालेल्या प्रवासाबद्दल चर्चा केल्या पण यातून त्यांनी त्यांची आंतरिक शक्ती कशी शोधली या भूमिकेबद्दल देखील विचारले.
Bhakshak च्या यशानंतर भूमीला हॉलिवूडचे वेध! लवकरच लॉस एंजेलिसला जाणार
स्मृती इराणी यांनी या मुलाखतीत महिलांचे हक्क आणि आकांक्षांना मोठ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी असलेलं त्यांचं स्वप्न या बद्दल देखील आपला दृष्टीकोन मांडला आहे. महिला सक्षमीकरणाविषयी राष्ट्रपतींचे विचार आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांसह त्या आपल्या वैयक्तिक जीवनात कस संतुलन ठेवतात अश्या वैविध्यपूर्ण गप्पा यातून उलगडल्या आहेत.
शेवटी 2024 च्या निवडणुका जवळ आल्या असून राष्ट्रपतींच्या आध्यात्मिक श्रद्धा, श्रीकृष्ण भगवान यांच्यावरील त्यांचा विश्वास आणि भारतातील तरुणांसाठीचा त्यांचा संदेश या बद्दल त्यांनी आपले विचार मांडले आहे. अंतर्दृष्टी मिळते.