Earthquake in Delhi : राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये आज भूकंपाचे धक्के (Earthquake in Delhi) बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदु पाकिस्तानात होता. पाकिस्तानचे (Pakistan) राजधानीचे शहर आणि लाहोरमध्ये भूकंप झाला. 5.8 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप होता. उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्येही या भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तानही या भूकंपाने हादरला. मागील दोन आठवड्यांत दिल्लीत हा दुसरा भूकंप आहे. या भूकंपामुळे नागरिक मात्र भयभीत झाले. अनेकांनी घरातून बाहेर येत मोकळ्या मैदानाकडे धाव घेतली.
पृथ्वीच्या आत सात टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट न थांबता फिरत असतात. या प्लेट ज्यावेळी एकमेकांना धडकतात. रगडल्या जातात. त्यावेळी जमिनीला धक्के बसतात. यालाच भूकंप म्हणतात. भूकंपाचे मोजमाप करण्यासाठी रिक्टर या परिमाणाचा वापर केला जातो. याला रिक्टर मॅग्नीट्यूड असेही म्हणतात. रिक्टर मॅग्निट्यूड स्केल एक ते 9 पर्यंत असते. भूकंपाची तीव्रता त्याच्या केंद्रापासून मोजली जाते. म्हणजेच या केंद्रातून निघणाऱ्या उर्जेला याच स्केलवर मोजले जाते. जर रिक्टर परिमाणावर भूकंपाची तीव्रता 7 मोजली गेली तर भूकंपाच्या केंद्रापासूनचा 40 किलोमीटरच्या परिसरात भूकंपाचे जोरदा धक्के बसतात.
ब्रेकिंग! जम्मू काश्मीरात लष्करी वाहनावर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला
भूकंप किती धोकादायक आहे हे ठरवण्यासाठी त्याची तीव्रता रिक्टर स्केलवर मोजली जाते. या परिमाणातील प्रत्येक स्केल दुसऱ्या स्केलपेक्षा दहा पट जास्त धोकादायक असतो.
0 ते 1.9 तीव्रता असणाऱ्या भूकंपाची माहिती फक्त सीज्मोग्राफ द्वारेच कळू शकते.
2 ते 2.9 तीव्रता असणाऱ्या भूकंपात हलके कंपन झाल्यासारखे जाणवते.
3 ते 3.9 तीव्रता असणाऱ्या भूकंपात एखादी रेल्वे आपल्या अगदी जवळून गेल्यासारखे वाटते.
4 ते 4.9 तीव्रता असणाऱ्या भूकंपात घराच्या खिडक्या तुटू शकतात. भिंतीवर लावलेले फोटो खाली पडू शकतात.
5 ते 5.9 तीव्रता असणाऱ्या भूकंपात घरातील फर्निचर आणि जड वस्तू हलू शकतात.
6 ते 6.9 तीव्रता असणाऱ्या भूकंपात इमारतीचा पाया डळमळीत होऊ शकतो तसेच इमारतीच्या वरच्या मजल्यांचे नुकसान होऊ शकते.
7 ते 7.9 तीव्रता असणाऱ्या भूकंपात इमारती कोसळतात. जमिनीच्या आत असणाऱ्या पाइपलाइन फुटतात.
8 ते 8.9 तीव्रता असणाऱ्या भूकंपात इमारतींसह मोठे पूलही पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतात.
9 किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रता असणाऱ्या भूकंपात मात्र प्रचंड नुकसान होते. जर कुणी मोकळ्या मैदानात असेल तर त्याला जमीन हलताना स्पष्ट दिसेल. समुद्र जवळ असेल तर त्सुनामी येण्याची शक्यता असते.
Taiwan Earthquake : एकाच रात्रीत भूकंपाचे तब्बल 80 धक्के; एका बाजूला झुकल्या इमारती