Download App

मोठी बातमी : गुजरात समाचारचे मालक बाहुबली शाहांना अटक; मनी लॉन्ड्रिंगप्रकरणात ईडीची कारवाई

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात Bahubali Shah यांना शुक्रवारी अटक केली आहे. अटकेनंतर शाह यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल केले.

  • Written By: Last Updated:

ED arrests Gujarat Samachar co-owner Bahubali Shah: गुजरातमधील प्रसिद्ध गुजरात समाचार वृत्तपत्राचे (Gujarat Samachar) मालक बाहुबली शाह (Bahubali Shah) यांच्याविरुद्ध ईडीने (ED) मोठी कारवाई केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शाह यांना शुक्रवारी अटक केली आहे. अटकेनंतर शाह यांची प्रकृती खालावली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवडमधील चिखली-कुदळवाडी टीपी स्कीम रद्द; प्रशासन झुकले, स्थानिकांच्या आंदोलनाला यश…

शाह हे पंधरा व्यावसायिक क्षेत्राशी निगडीत आहेत. अनेक ठिकाणी छापेमारी केल्यानंतर ईडीने शाह यांना ताब्यात घेतले आहे. बाहुबली शाह हे लोक प्रकाशन लिमिटेडचे संचालक आहेत. ही कंपनी गुजरात समाचार हे वृत्तपत्र प्रसिद्ध करते. तर जीएसटीव्ही चॅनलही चालविते. बाहुबली शाह हे वृत्तपत्राचे व्यावस्थापकीय संपादक आहेत. बाहुबली शाह यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु ईडीने अटकेबाबत अधिकृतपणे काही घोषणा केलेली नाही.

या अटकेनंतर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून भाजपवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. भाजप हा माध्यमांना घाबरविण्यासाठी आणि गप्प बसविण्यासाठी केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग करत असल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत सरकारवर हल्लाबोल केलाय. गुजरात समाचार वृत्तपत्रावर ही केवळ कारवाई नाहीतर पूर्ण लोकशाहीचा आवाज दाबविण्याचा हा प्रयत्न आहे. हा एक कट आहे. सत्ताधाऱ्यांवर लिहिणाऱ्याला वृत्तपत्राला टाळे लावले आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात आलीय. बाहुबली शाह यांना अटक ही घाबरलेल्या राजकीय नेत्यांचा हिस्सा आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्याकडं सापडली तब्बल ८ कोटींची कॅश; वाचा, ईडीच्या धाडीत काय सापडलं?

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, मागील 48 तासांत गुजरात समाचार, जीएसटीव्हीवर आयकर व ईडीकडून छापेमारी करण्यात आली. त्यानंतर मालक बाहुबली शाह यांना अटक करण्यात आलीय. भाजप हा हाताश झालेला आहे. खरे बोलणारे, प्रश्न विचारणाऱ्यांचे आवाज दाबला जात आहे.

follow us