Election Commission : दिल्लीतील विज्ञान भवनात निवडणूक आयोगाची (Election Commission) पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) आणि हरियाणामध्ये (Haryana) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तारखा जाहीर केले आहे.
यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतरचा हा दुसरा टप्पा आहे. लोकसभेच्या निवडणुका अतिशय शांततेत पार पडल्या, ज्याची संपूर्ण जगात चर्चा झाली तसेच या निवडणुकीत अनेक विक्रम देखील झाले असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.
पुढे बोलताना राजीव कुमार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत जम्मू आणि काश्मीरमध्ये मतदानाच्या लांबलचक रांगा दिसल्या होत्या आणि यावरून हे स्पष्ट होते की तिथल्या लोकांना बुलेटवर नाहीतर बॅलेटवर निवडणुका हव्या आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान होणार आहे. यापैकी 74 सर्वसाधारण आणि 16 राखीव आहेत (ST-9, SC-7) अशी देखील माहिती त्यांनी दिली.
जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण मतदारांची संख्या 87.09 लाख आहे, त्यापैकी 44.46 लाख पुरुष आणि 42.62 लाख महिला मतदार आहे तर यावेळी तरुण मतदारांची संख्या 20 लाख आहे तसेच मतदानासाठी यावेळी एकूण 11838 मतदान केंद्रे असतील. नेहमीप्रमाणेच स्वतंत्र महिला मतदान केंद्रे बांधली जातील. असं देखील यावेळी राजीव कुमार म्हणाले. तसेच जम्मू-काश्मीरची मतदार यादी 20 ऑगस्टला निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार आहे.
In true spirit of keeping promises, here is a shorter electioneering period and in the best possible conducive weather. Schedule for Elections in J&K to be held in 3 phases : CEC Kumar pic.twitter.com/ck9tFVoFFD
— Election Commission of India (@ECISVEEP) August 16, 2024
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदार होणार आहे. पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबरला, दुसऱ्या टप्प्यात 25 सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यात 01 ऑक्टोबर रोजी मतदार होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
राज्यात सत्ताबदल गरजेचाच, एकजूट कायम ठेवा; शरद पवारांना कोणत्या संकटाची चाहूल..
तर हरियाणामध्ये 01 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदार होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच दोन्ही राज्यातील मतमोजणी 04 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
2014 मध्ये झालेल्या जम्मू-काश्मीरमध्ये 25 नोव्हेंबर 2014 ते 20 डिसेंबर 2014 दरम्यान 5 टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडले होते आणि निकाल 23 डिसेंबर 2014 रोजी घोषित करण्यात आला होता.