निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, राज्यात महापालिका निवडणुका दोन टप्प्यात? ‘या’ दिवशी होणार घोषणा

Municipal Corporation Elections 2025 : राज्यात सुरु असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबर रोजी 264 नगर

  • Written By: Published:
Municipal Corporation Elections 2025

Municipal Corporation Elections 2025 : राज्यात सुरु असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 2 डिसेंबर रोजी 264 नगर पंचायत आणि नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात महानगर पालिकांच्या निवडणुका होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडे (State Election Commission) वेळ कमी असल्याने दुसऱ्या टप्प्यात महापालिका निवडणुका होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. तर आता महापालिका निवडणुकांची (Municipal Corporation Elections 2025) तारीख समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राज्यात महानगर पालिकेच्या निवडणुकीला 15 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. राज्य निवडणूक आयोग 15 डिसेंबर रोजी महानगर पालिका निवडणुकांची घोषणा करु शकतो. माहितीनुसार, राज्यात महानगर पालिका निवडणुका दोन टप्प्यात होणार आहे. सुरुवातीला क आणि ड महानगर पालिका निवडणुका आणि त्यानंतर अ आणि ब वर्गातील महानगर पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या मुंबई महानगरपालिका (BMC Election) निवडणुकांसह पुणे, ठाणे आणि राज्यातील इतर महत्वाचे महानगर पालिकांच्या निवडणुका एकत्र होणार असल्याची चर्चा जोराने राजकीय वर्तुळात सुरु आहे. महानगर पालिका निवडणुकीसाठी राज्यात 15 डिसेंबरपासून आचार संहिता लागू होणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. यापूर्वी राज्य निवडणूक आयोग सर्व महानगर पालिकानिवडणुका तिसऱ्या टप्प्यात एकत्र घेणार असं सांगितले जात होते मात्र नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकी आरक्षणावरुन झालेल्या वादानंतर राज्य निवडणूक आयोग महापालिका निवडणुका दुसऱ्या आणि जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुका तिसऱ्या टप्प्यात घेण्याचा विचार करत असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

बोगस प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करा; विजय वडेट्टीवारांची विधानसभेत मागणी

21 डिसेंबर रोजी निकाल

2 डिसेंबर रोजी झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा निकाल 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या 24 नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या मतदान प्रक्रियेनंतर एकत्र 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडापीठाने राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिले आहे.

follow us