Download App

भाजपला यंदा मिळाली तिप्पट देणगी; काँग्रेसपेक्षा छोट्या राज्यातील पक्षाची मोठी बाजी !

इलेक्टोरल ट्रस्ट, खाजगी कंपन्यांनी भाजपला भरघोस देणगी दिली असून यंदाच्या वर्षी भाजपला 2244 कोटी रुपये मिळाले आहेत.

BJP : भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतच घवघवीत यश मिळाल्याचं दिसून आलंय. या निवडणुकीत भाजपने विरोधी पक्षांना चांगलच मागे टाकलंय. अशातच आता देणग्यांमध्येही भाजपला इलेक्टोरल ट्रस्ट (Electoral Trust) आणि खाजगी कंपन्यांच्या देणग्यांमधून तब्बल 2244 कोटी रुपये मिळाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी तिप्पट देणगी मिळाली आहे.

विराटचं निलंबन की खिशाला भुर्दंड? धक्काबुक्कीचा काय होणार इफेक्ट; नियम काय सांगतो..

तर दुसरीकडे काँग्रेसला यंदाच्या वर्षी 289 कोटी रुपये मिळाले असून मागील वर्षी काँग्रेसला 79.9 कोटी रुपये मिळाले होते. भाजप आणि काँग्रेस या दोघांना प्रुफंड इलेक्टोरल ट्रस्टकडून सर्वाधिक देणग्या मिळाल्या आहेत. भाजपला 723 कोटी तर काँग्रेसला 156 कोटी रुपये दिले आहेत. 2023-24 मध्ये भाजपच्या देणग्यांपैकी जवळजवळ एक तृतीयांश देणगी आणि काँग्रेसच्या निम्म्यापेक्षा अधिक देणग्या प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून आल्या आहेत. 2023-24 मध्ये भाजपला सर्वाधिक 2,244 कोटी रुपयांची देणगी मिळाली, तर तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा पक्ष BRS दुसऱ्या क्रमांकावर असून बीआरएसला 580 कोटी रुपयांची देणगी मिळाली, तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे, काँग्रेसला 289 रुपयांची देणगी मिळालीयं.

राजीव गांधींनी मुस्लिमांच्या विरोधामुळे ज्या पुस्तकावर बंदी घातली, ‘त्या’ पुस्तकाला 36 वर्षांनी भारतात मिळाली एन्ट्री

कोणी दिलीयं देणगी?
2022-23 मध्ये प्रुडंटला सर्वाधिक देणग्या देणाऱ्या संस्थांमध्ये मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लिमिटेड, सीरम इन्स्टिट्यूट, आर्सेलर मित्तल ग्रुप आणि भारती एअरटेल यांचा समावेश आहे. भाजप आणि काँग्रेसने दिलेल्या देणगीच्या खात्यांमध्ये इलेक्टोरल बाँड्स समाविष्ट नाहीत. नियमांनुसार, राजकीय पक्षांना हे तपशील त्यांच्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालात जाहीर करावे लागत आहेत.

दरम्यान, काही प्रादेशिक पक्षांनी 2023-24 च्या त्यांच्या योगदानाच्या अहवालात स्वेच्छेने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून त्यांच्या पावत्या घोषित केल्या आहेत. यामध्ये बीआरएसचा समावेश आहे, ज्यांना 495.5 कोटी रुपये रोख्यांमध्ये मिळाले आहेत. डीएमकेला 60 कोटी रुपये आणि वायएसआर काँग्रेसला 121.5 कोटी रुपये या आता बंद पडलेल्या साधनाद्वारे मिळाले. जेएमएमला रोख्यांच्या माध्यमातून 11.5 कोटी रुपये मिळाले.

भाजपला मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी त्यांच्या योगदानात 212 टक्के वाढ नोंदवलीयं. हे वर्ष निवडणुकीपूर्वीचं होतं. 2019 च्या निवडणुकीआधी भाजपला 742 कोटी रुपये तर काँग्रेसला 146.8 कोटी रुपये मिळाले होते. भाजपला इलेक्टोरल ट्रस्टच्या माध्यमातून 850 कोटी रुपये मिळाले तर 723 कोटी रुपये प्रुडंटकडून, तर 127 कोटी रुपये ट्रायम्फ इलेक्टोरल ट्रस्टकडून 17.2 लाख रुपये एंगेजिंग इलेक्टोरल ट्रस्टकडून आले आहेत.

फ्यूचर गेमिंगमधून मिळाले भाजपला पैसे…
फ्यूचर गेमिंगच्या माध्यमातूनही भाजपसह काँग्रेसला पैसा मिळाला असून फ्यूचर गेमिंगमधून काँग्रेसला 156 कोटींपेक्षाही अधिक रक्कम मिळालीयं, तरीही प्रुडंट हा एकच देणगीदार होता. प्रुडंटने 2023-24 मध्ये अनुक्रमे 85 कोटी आणि 62.5 कोटी रुपयांचे योगदान बीआरएस आणि वायएसआर, काँग्रेसला दिले.

follow us