राजीव गांधींनी मुस्लिमांच्या विरोधामुळे ज्या पुस्तकावर बंदी घातली, ‘त्या’ पुस्तकाला 36 वर्षांनी भारतात मिळाली एन्ट्री

  • Written By: Published:
राजीव गांधींनी मुस्लिमांच्या विरोधामुळे ज्या पुस्तकावर बंदी घातली, ‘त्या’ पुस्तकाला 36 वर्षांनी भारतात मिळाली एन्ट्री

The Satanic Verses : राजीव गांधी (Rajiv Gandhi) सरकारने मुस्लिमांच्या विरोधामुळे ब्रिटिश-भारतीय कादंबरीकार सलमान रश्दी (Salman Rushdie) यांचे वादग्रस्त पुस्तक “द सॅटॅनिक व्हर्सेस” (The Satanic Verses) वर 36 वर्षांपूर्वी बंदी घातली होती तीच पुस्तक आता भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून देशाची राजधानी दिल्लीमध्ये असलेल्या ‘बहरीसन्स बुकसेलर्स’ (Bahrisons Booksellers) मध्ये या पुस्तकाचा मर्यादित स्टोक विक्रीसाठी उपलब्ध आहे. या पुस्तकातील मजकूर आणि लेखकाच्या विरोधात अनेक मुस्लिम संघटनांनी विरोध दर्शवला आहे.

बहरीसन्स बुकसेलर्सच्या मालक रजनी मल्होत्रा ​​(Rajni Malhotra) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्हाला पुस्तक मिळून काही दिवस झाले आहेत आणि आतापर्यंत या पुस्तकाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून विक्रीही चांगली होती आहे. या पुस्तकाची किंमत 1,999 रुपये असून पुस्तक फक्त दिल्ली- एनसीआरमधील ‘बहरीसन बुकसेलर्स’ स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. तर एक्सवर सलमान रश्दीचे ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ आता बहरिसन्स बुकसेलर्सवर उपलब्ध आहेत. अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

पेंग्विन रँडम हाऊस इंडियाच्या मुख्य संपादक मानसी सुब्रमण्यम यांनीही एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, भाषा धैर्य देते, कल्पना स्वीकारण्याची आणि व्यक्त करण्याची क्षमता निर्माण करते आणि या धैर्याने सत्य आकार घेते. शेवटी 36 वर्षांच्या बंदीनंतर सलमान रश्दीच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ला भारतात विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. हे पुस्तक बहारीसन बुकस्टोअर, दिल्ली येथे उपलब्ध आहे.

पुस्तक प्रकाशित झाल्यापासून जगात या पुस्तकामधील मजकूरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे आणि त्यामुळे संपूर्ण जगात स्वातंत्र्य, श्रद्धा आणि कला यावर वाद सुरू झाला आहे. राजीव गांधी सरकारने 1988 मध्ये पुस्तकावर बंदी घातली होती. तर 1988  मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर अडचणीत सापडली होती. या पुस्तकावर वाद इतका वाढला होता की, इराणचे नेते रुहोल्ला खोमेनी यांनी मुस्लिमांना रश्दी आणि त्यांच्या प्रचारकांना मारण्याचे आवाहन करणारा फतवा जारी केला होता. त्यानंतर लेखक सलमान रश्दी यांनी जवळपास 10 वर्षे ब्रिटन आणि अमेरिकेत लपून राहिले.

अजितदादा, भुजबळ अन् आता शिवेंद्रराजे भोसले, मंत्रालयातील 602 नंबरचा दालन घेण्यास मंत्री का घाबरतात?

तर जुलै 1991 मध्ये कादंबरीकाराचा जपानी अनुवादक हितोशी इगाराशी यांची त्यांच्या कार्यालयात हत्या करण्यात आली होती. तर लेबनीज-अमेरिकन हादी मातर यांनी 12 ऑगस्ट 2022 रोजी एका व्याख्यानादरम्यान स्टेजवर रश्दी यांच्यावर चाकूने हल्ला केला, ज्यामुळे त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube