Electoral Bond Data : EC कडून निवडणूक रोख्यांची माहिती जाहीर, भाजपाला छप्परफाड देणगी…
Electoral Bond Data : सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांविषयी (Electoral Bond Data) आदेश दिल्यानंतर आता भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून निवडणूक आयोगाकडे माहिती देण्यात आली आहे. या माहितीनूसार भारतीय जनता पार्टीला (BJP) नावे 6 हजार 60 कोटी रुपयांची देणगी या निवडणूक रोख्यांतून मिळाल्याचं समोर आलं आहे. निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला कोट्यावधी मिळाले असल्याचंही समोर आलं आहे. निवडणूक रोख्यांमध्ये देशात भाजपाच पहिल्या नंबरवर असल्याचं समोर आलं आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर तृणमूल काँग्रेसच्या (Congress) नावावर 1 हजार 609 कोटी मिळाले आहेत. यामध्ये देशातील अनेक पक्षांच्या नोंदी आहेत. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या नावानेही नोंदी आढळून आल्या आहेत.
निवडणूक आयोगाकडून ही माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार 1 एप्रिल 2019 ते 11 एप्रिल 2019 दरम्यान एसबीआयकडून 3,346 निवडणूक रोख्यांची खरेदी केली गेली. यापैकी 1,609 रोखे वटवण्यात आले. तसेच 12 एप्रिल 2019 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत या पाच वर्षांच्या काळात 18,871 निवडणूक रोखे खरेदी केले गेले. तर याच काळात 20,421 रोखे वटवले गेले. भारतीय स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून एकूण 22,217 निवडणूक रोख्यांची खरेदी केली गेली आणि त्यापैकी 22,030 रोखे वटवण्यात आले आहेत.
राहुल गांधींचं जीव तोडून भाषण मात्र, पवार मोबाईलमध्ये व्यस्त; भाकरी फिरवण्याची चर्चा कुणाशी?
सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश काय?
इलेक्टोरल बॉंड प्रकरणी इलेक्टोरल बॉंडचे नंबर देखील भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियाला जाहीर करावे लागणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. याआधी 11 मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बाँड्सची माहिती देण्यासंदर्भातील SBI च्या याचिकेवर सुमारे 40 मिनिटे सुनावणी केली होती. या सुनावणीत बाँडशी संबंधित माहिती देण्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही, पण त्यासाठी थोडा वेळ हवा असल्याचं एसबीआयकडून सांगण्यात आलं होतं. यावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने म्हटले, SBI ने 12 मार्चपर्यंत सर्व माहिती जाहीर करावी. निवडणूक आयोगाने 15 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व माहिती संकलित करून वेबसाइटवर प्रसिद्ध करावी.
दरम्यान, कोणत्या कंपनीने निवडणूक रोख्यांची खरेदी केली? किती निवडणूक रोख्यांची किती रुपयांना खरेदी केली? तसेच हे निवडणूक रोखे कोणत्या पक्षाने वटवले याबाबतची माहिती देखील एसबीआयने निवडणूक आयोगाला दिली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने ही माहिती त्यांच्या अधिकृत सकेतस्थळावरून जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावरून जाहीर केलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीच्या नावे 8,633 नोंदी आहेत.
“तुमची साथ असेल तर मोठे पाऊल उचलणार”; सुनेत्रा पवारांनी दिले लोकसभा लढण्याचे संकेत
भाजपाला 8,633 निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून 6 हजार 60 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. तर काँग्रेसच्या नावे 3,145 नोंदी असून याद्वारे त्यांना 1 हजार 421 कोटी रुपये देणगी मिळाली आहे. यामध्ये देशभरातील बहुसंख्या पक्षांच्या नोंदी आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेच्या नावानेदेखील नोंदी आहेत. सर्वोच न्यायालयाच्या आदेशानंतर एसबीआयने निवडणूक रोख्यांविषयीची सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. ही माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.