“तुमची साथ असेल तर मोठे पाऊल उचलणार”; सुनेत्रा पवारांनी दिले लोकसभा लढण्याचे संकेत

“तुमची साथ असेल तर मोठे पाऊल उचलणार”; सुनेत्रा पवारांनी दिले लोकसभा लढण्याचे संकेत

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात (Lok Sabha Election) बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक गाजणार आहे. या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळेच (Supriya Sule) आहेत. परंतु, महायुतीचा उमेदवार अजून फायनल नाही. तरीही अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) याच उमेदवार असतील अशी दाट शक्यता आहे. यानंतर आता खुद्द सुनेत्रा पवारांनीच मोठं वक्तव्य करत उमेदवारीचे संकेत दिले आहेत. दादांना आणि मला तुमची साथ हवी आहे. तुमची साथ असेल तर मी मोठं पाऊल उचलेल असे सूचक वक्तव्य सुनेत्रा पवार यांनी केले. बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले.

Maharashtra Politics : ‘2015 नंतर राष्ट्रवादीत निवडणुकाच नाहीत’; तटकरेंच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट!

बारामतीत यंदा दोन्ही पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता तर सुनेत्रा पवार यांच्या महाविजयाचे बॅनरही दिसू लागले आहेत. महायुतीकडून उमेदवाराचं नाव फायनल झालं नसलं तरी सुनेत्री पवार यांची उमेदवारी पक्की आहे. निर्धार महाविजयाचा या बॅनरची मोठी चर्चा बारामतीत आहे. या बॅनरद्वारे स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. तसेच सुनेत्रा पवार याच उमेदवार असतील हे ठरले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अजितदादांनी सातारा, शिरुर, रायगड आणि बारामती या जागा आपण लढणारच असे त्यांनी सांगितले. तिथूनच चर्चा सुरु झाली की अजितदादांकडून उमेदवार कोण असणार? विविध सभांमधून अजितदादा माझ्या शब्दावर तुम्ही माझ्या विचाराचा उमेदवार निवडून द्या. लोकसभेला दगाफटका झाला तर मी विधानसभेला वेगळे परिणाम बघायला मिळतील असा दमही ते देताना दिसतात. मात्र नुकतेच एका सभेत बोलताना त्यांनी आपला उमेदवार नवखा आहे. तो पहिल्यांदाच खासदार होणार आहे, असे सांगतिल्याने नेमका कोण उमेदवार असणार असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.

बारामती लोकसभा : सुनेत्रा पवार लढणारच; म्हणूनच अजितदादा भावनिक झाले आहेत!

अशात मागील काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती दिसत आहे. पक्षाच्या बॅनर्सवर अजितदादांसोबतच त्यांचेही फोटो दिसून येत आहेत. नुकतेच बारामती दाखल झालेल्या प्रचार रथावरही सुनेत्रा पवार यांचा फोटो दिसत आहे. अजितदादा म्हणाले त्याप्रमाणे त्या निवडणुकीला उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या तर त्या पहिल्यांदाच खासदार होतील. यापूर्वी त्यांनी कधीही कोणतीही निवडणूक लढविलेली नाही. पक्षातही त्या सक्रिय नव्हत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube