Controversy On Reliance Name : रिलायन्स ब्रँड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. उद्योजक अनिल अंबानी यांनी हिंदुजा उद्योग समूहावर रिलायन्स नाव वापरल्याचा आरोप केला आहे. त्यासाठी त्यांनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलकडे तक्रार केली आहे. (Reliance) रिलायन्स संस्थापक धिरुभाई अंबानी यांच्यानंतर रिलायन्स या नावावरून वाद झाला होता. रिलायन्स हे नाव वापरण्याचा अधिकार नेमका मुकेश अंबानी यांना मिळणार की त्यांचे बंधू अनिल अंबानी यांना मिळणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. शेवटी अंबानी कुटुंबाने रिलायन्स हे नाव दोघांनाही वापरता येईल, असा तोडगा काढला. आता हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय; SIT होणार स्थापन
अनिल अंबानी यांची मालकी असलेल्या अनिल धीरूभाई अंबानी व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने एनसीएलटीमध्ये एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेत हिंदुजा ग्रुपचा मालकी हक्क असलेल्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स या कंपनीला रिलायन्स हे नाव वापरण्यापासून रोखावं, अशी मागणी केली आहे. या प्रकरणावर एनसीएलटी मंगळवारी (20 ऑगस्ट) सुनावणी घेणार आहे.
आयआयएचएलने नुकतेच कर्जदारांचे 9,641 कोटी रुपये देऊन रिलायन्स कॅपिटल्सचे अधिग्रहण केले होते. रिलायन्स कॅपिटलला 25 हजार कोटी रुपयांचे कर्ज चुकवता आले नव्हते. निलामीदरम्यान आयआयएचएलने रिलायन्स कॅपिटलला खरेदी केले होते. आयआयएचएलच्या निविदेला क र्जदारांनी जून 2023 मध्ये मंजुरी दिली होती.
Video: आता बस्स झालं! यांना चिरडून मारा; बदलापूर अत्याचार प्रकरणावर आमदार शिरसाठ संतप्त
अनिल अंबानी यांनी केलेल्या याचिकेत फक्त अंबानी कुटुंब रिलायन्स हे ब्रँड वापरू शकतो, असा दावा केला आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीची जिओ फायनॅन्शीयल सर्व्हिसेस ही कंपनी लवकरच देशात आर्थिक सेवा चालू करणार आहे. असं असताना अंबानी बंधू वगळता अन्य कोणालाही रिलायन्स या नावाचा उपयोग करायला परवानगी देऊ नये, अशी मागणी अनिल अंबानी यांनी केली आहे. रिलायन्स नावाचा वापर करण्यास मंजुरी देताना आमची बाजी जाणून घेण्यात आली नव्हती, असा दावाही मुकेश अंबानी यांनी केला आहे.