माजी रेल्वेमंत्र्यांना घातपाताचा संशय; तपास करण्यासाठी सरकारला दिल्या ‘या’ टिप्स

Odisha Train Accident : ओडिशात भीषण अपघात (Odisha Train Accident) झाला. शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यापेक्षा कितीतरी जास्त जखमी झाले. कुणाचे हात गेले तर कुणाचे पाय. कुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तर कुणाचे कुटुंबच हिरावले गेले. या भीषण घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी या घटनेची चौकशी […]

UPSC Exam

UPSC Exam

Odisha Train Accident : ओडिशात भीषण अपघात (Odisha Train Accident) झाला. शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यापेक्षा कितीतरी जास्त जखमी झाले. कुणाचे हात गेले तर कुणाचे पाय. कुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तर कुणाचे कुटुंबच हिरावले गेले. या भीषण घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली. माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी (Dinesh Trivedi) यांनी मात्र या घटनेत घातपाताचा संशय व्यक्त केला.

त्रिवेदी यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी रेल्वे अपघातात घातपाताचा संशय व्यक्त केला. ते म्हणाले, प्रधानमंत्र्यांना या घटनेमुळे अतिशय दुःख झाले आहे. यासाठी आता उच्चस्ततरी समिती नेमली जाईल. ज्यामुळे सत्य काय आहे ते बाहेर येईल. मी फक्त इतकेच म्हणतो आहे की समितीने कोणत्याच गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. कारण, ही घटना एक षडयंत्र देखील असू शकते. कारण, या अपघाताचं टायमिंग विचित्र आहे.

ओडिशा रेल्वे अपघाताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद, जगभरातील नेत्यांनी व्यक्त केल्या सहवेदना

ते पुढे म्हणाले, मी जे दृश्य पाहिलं त्यातून आपण भूकंपानंतरचं दृश्य पाहतोय असं वाटत होतं. जपानप्रमाणे आपल्याकडेही रेल्वे दुर्घटनांत एकही मृत्यू होता कामा नये, हे आपलं लक्ष्य असलं पाहिजे. नवीन तंत्रज्ञान येत आहे. त्याला रेल्वेच्या सिस्टीममध्ये दाखल करून घेतलं जात असल्याचे त्रिवेदी म्हणाले.

राजदचे ज्येष्ठ नेते माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनीही या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घटने जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे त्यांनी म्हटले आहे.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, बालासोरमध्ये झालेला हा अपघात सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे. सत्य काय आहे ते समजण्यासाठी या घटनेची योग्य तपासणी होणे गरजेचे आहे. या घटनेमागे जरूर काहीतरी असेल. सत्य समोर आलेच पाहिजे. रेल्वे धडकू नयेत यासाठी जी प्रणाली आहे त्याचे काय झाले असे त्यांनी विचारले.

जर असतं रेल्वेचं ‘कवच’ तर अपघातच झाला नसता; जाणून घ्या, काय आहे टेक्नॉलॉजी?

Exit mobile version