जर असतं रेल्वेचं ‘कवच’ तर अपघातच झाला नसता; जाणून घ्या, काय आहे टेक्नॉलॉजी?

जर असतं रेल्वेचं ‘कवच’ तर अपघातच झाला नसता; जाणून घ्या, काय आहे टेक्नॉलॉजी?

Indian Railway Kavach Technology : ओडिशात भीषण अपघात झाला. शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यापेक्षा कितीतरी जास्त जखमी झाले. कुणाचे हात गेले तर कुणाचे पाय. कुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तर कुणाचे कुटुंबच हिरावले गेले. हे सगळं कदाचित टाळता आलं असतं. रेल्वेचं कवच असतं तर हा अपघात झाला नसता असे सांगितले जात आहे. यावर सोशल मीडियात संताप व्यक्त केला जात असून रेल्वेच्या सुरक्षेवर सरकारला सवाल केले जात आहेत. या संकटाच्या घडीत भारतीय रेल्वेचे सुरक्षा ‘कवच’ (Indian Railway Kavach Technology) पुन्हा चर्चेत आले आहे. ज्याचे उद्घाटन मागील वर्षातच करण्यात आले होते.

रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून कवच प्रणाली तयार केली होती. या प्रणालीच्या अस्तित्वात येण्यामुळे असे मानले जात होते की रेल्वे अपघातांवर नियंत्रण ठेवता येईल. पण, काल मात्र या अपेक्षांवरही पाणी पडले. ओडिशा राज्यातील बालासोरमध्ये भीषण अपघात झाला. शेकडो लोकांना जीव गमवावा लागला.

Video : आडनावाचा विषय : गौतमीसाठी सारा गाव एकवटला!

रेल्वे अपघात रोखण्यासाठी भारतीय रेल्वेच्या कवच प्रणालीला मास्टरस्ट्रोक मानले जात होते. या कवच तंत्रज्ञानाबद्दल असे सांगितले जात होते की जर एकाच रुळावर रेल्वे जरी समोरून आली तरी अपघात होणार नाही. सरकारने त्यावेळी स्पष्ट केले होते की कवट टेक्नॉलॉजी लवकरच देशातील प्रत्येक रेल्वे ट्रॅक आणि रेल्वे गाड्यांत इन्स्टॉल केले जाईल.

मार्च 2022 मध्ये या प्रणालीची चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये एकाच रुळावर धावणाऱ्या दोन रेल्वेंपैकी एका रेल्वेत स्वतः रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव होते. एकाच रुळावर समोरून येणारी रेल्वे आणि इंजिन कवच तंत्रज्ञानामुळे एकमेकांना धडकले नाहीत. याचे कारण म्हणजे, कवचने रेल्वेमंत्री बसलेल्या रेल्वेला समोरून येणाऱ्या इंजिनापासून 380 मीटर अंतरावरच असतानाच रोखले होते. ही चाचणी यशस्वी करण्यात आली होती.

यानंतर रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले होते, की जर एकाच रुळावर दोन रेल्वे आमनेसामने असतील तर कवच टेक्नोलॉजी रेल्वेचा वेग कमी करून इंजिनात ब्रेक लावते. यामुळे दोन रेल्वे एकमेकांना धडकत नाहीत. 2022-23 मध्ये या प्रणालीला या वर्षी दोन हजार किलोमीटर रेल्वे नेटवर्कवर स्थापित करण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक वर्षात चार ते पाच हजार किलोमीटर नेटवर्कवर स्थापित केले जाईल. मात्र, हे काम ज्या वेगाने होणे अपेक्षित होते तसे झाले नाही असे म्हटले जात होते.

Coromandel Express Accident : 42 वर्षांमधील भारतातील सर्वात मोठे रेल्वे अपघात, उत्तर प्रदेशमध्ये झाली सर्वाधिक हानी

अशी आहे कवच टेक्नॉलॉजी

कवच टेक्नोलॉजीला आरडीएसओने विकसित केले होते. संस्थेने या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी रेल्वेची वेग मर्यादा जास्तीत जास्त 160 किमी प्रति तास निश्चित करण्यात आली होती. या सिस्टिममध्ये कवचाचा संपर्क रेल्वेचे रुळ आणि रेल्वे इंजिन यांच्याबरोबर असतो. रुळांबरोबर याचा एक रिसीव्हर असतो. तर रेल्वेच्या इंजिनमध्ये एक ट्रान्समीटर बसवले जाते. ज्यामुळे रेल्वेचे लोकेशन सतत कळत राहते.

कवच कसे रोखणार रेल्वे

या प्रणालीच्या बाबतीत असेही म्हटले गेले होते की ज्यावेळी दोन रेल्वे ठराविक अंतराच्या आत एकाच रुळावर असतील त्यावेळी या प्रणालीच्या माध्यमातून रेल्वे आपोआप थांबतील. या प्रणालीची सुरुवात दिल्ली हावडा आणि दिल्ली मुंबई या रेल्वे मार्गांवर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.

रेल्वेमंत्रीजी कुठंय तुमचं कवच, सोशल मीडियावर संताप 

या घटनेवर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नेटकरी रेल्वेमंत्र्यांवर जोरदार टीका करत आहेत. काही जण म्हणत आहेत की अखेर हे कवच कुठे गायब झालं. युजर्स रेल्वेमंत्र्यांचा एक व्हिडीओ शेअर करत आहेत ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की कवचामुळे रेल्वेंचे अपघात होणार नाहीत. कवच दोन रेल्वेंची एकमेकांना धडक होण्यापासून रोखेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube