ओडिशा रेल्वे अपघाताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद, जगभरातील नेत्यांनी व्यक्त केल्या सहवेदना

ओडिशा रेल्वे अपघाताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरही पडसाद, जगभरातील नेत्यांनी व्यक्त केल्या सहवेदना

Leaders from all over the world expressed grief over the Odisha train accident: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगरा रेल्वे स्थानकाजवळ काल (शुक्रवारी) संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर या अपघातात तब्बल नऊशे पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आणखी जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  हा अपघात काल सायंकाळी ७ वाजता हा अपघात झाला. अपघातानंतर तातडीने मदत आणि बचावकार्य हाती घेण्यात आले. दरम्यान, या अपघाताने देशभरच नव्हे तर जगभर खळबळ उडाली. या  भीषण अपघातावर जगभरातील अनेक नेत्यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.

रशियाशी युद्ध लढत असलेले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला. त्यांनी आपलं ट्विट पीएम मोदींना टॅग केले आणि लिहिले की, आम्ही तुमचे दुःख समजू शकतो. मला आशा आहे या अपघातातील जखमी लोक हे लवकरात लवकर बरे होतील.

त्याचवेळी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी कॅनडाच्या लोकांना या अपघातानंतर भारतीयांना साथ देण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विट करत लिहिलं की, ओडिशातील रेल्वे अपघाताचे फोटो हे फारच हृदयद्रावक आहेत. या रेल्वे दुर्घटनेत ज्यांनी आपले कुटुंबीय, नातेवाईक गमावले आहेत, त्यांच्यासोबत माझ्या प्रार्थना असल्याचं ट्विट त्यांनी केलं.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही रेल्वे अपघातात मृत पावलेल्या आणि जखमी लोकांप्रती आपल्या सहवेदना व्यक्त केल्या. त्यांनी ट्विटकरून आपला शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिलं की, मी रेल्वे अपघातातील पीडितांसाठी प्रार्थना करतो. लोकांना वाचवण्यासाठी जे न थांबता काम करत आहेत ते कौतुकास पात्र आहेत.

इतर नेते काय म्हणाले?

साबा कोरोसी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले की, भारतातील रेल्वे अपघाताची बातमी ऐकून फारच दुःख झाले. तर अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक ग्रासिटी- ट्रेन दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो. आम्ही भारताच्या दु:खाच्या काळात त्यांच्यासोबत आहोत, अशा आशयाचं ट्विट केलं.
श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी ट्विट केले की, ओडिशातील रेल्वे अपघाताविषयी माहिती मिळाल्यावर मला खूप दुःख झाले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्वांच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube