Download App

अरविंद केजरीवालांना न्यायालयाचा दणका, 3 जुलैपर्यंत वाढला ‘तिहार’मधील मुक्काम

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोर्टाने त्यांच्या यालयीन कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ केली आहे

  • Written By: Last Updated:

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) केजरीवाल यांना मोठा दणका दिला. केजरीवाल यांच्या नियमित जामीन याचिकेवर राऊस अव्हेन्यू कोर्टात आज सुनावणी झाली. यावेळी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळं केजरीवाल यांना तिहार तुरुंगातच राहावे लागणार आहे.

… म्हणून राशी खन्नाने Aranmanai 4 स्क्रिप्ट न पाहताच केला होता साइन 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून 21 दिवसांचा अंतरिम जामीन मिळाल्यानंतर केजरीवाल यांनी आत्मसमर्पण केलं होतं. त्यानंतर जामीन मिळावा यासाठी पुन्हा एकदा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. मात्र, केजरीवाल यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. आज अरविंद केजरीवाल आणि विनोद चौहान यांची न्यायालयीन कोठडी संपत होती. त्यामुळे दोघांनाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

मात्र, यावेळी अंमलबजावणी संचालनालयाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. त्यानंतर राऊस एव्हेन्यू येथील विशेष पीएमएलए न्यायालयाने केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडी वाढ केली. केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवण्यात आली.

Anushka Sen : अनुष्का सेनच्या मादक अदा पाहून चाहते झाले घायाळ 

विशेष न्यायाधीश न्यायमूर्ती विंदू यांच्या न्यायालयात आजची सुनावणी झाली. ईडीच्या वतीने एएसजी एसव्ही राजू आणि केजरीवाल यांचे वकील विक्रम चौधरी न्यायालयात उपस्थित होते. दोघांनीही आपापल्या बाजूने युक्तीवाद केला. सुनावणीदरम्यान, सीएम अरविंद केजरीवाल यांच्या वतीने उपस्थित असलेल्या वकिलाने त्यांच्या न्यायालयीन कोठडी वाढवण्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या याचिकेला विरोध करत केजरीवाल यांची कोठडी वाढवण्यासाठी कोणताही आधार नाही, असा युक्तीवाद केला. तर  ईडीच्या वकिलाने सांगितले की, विनोद चौहान यांनी गोवा निवडणुकीसाठी के कविता यांच्या पीएकडून अभिषेक बोईनपल्ली यांच्यामार्फत 25 कोटी रुपये घेतले होते.  हे दोन्ही युक्तीवाद ऐकल्यानंतर  कोर्टाने न्यायालयीन सुनावणीत वाढ केली.

ईडीच्या आरोपपत्रात काय म्हटलं? 

मद्य घोटाळ्याच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की राजधानीतील दारू व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बदल्यात पंजाबमधील व्यावसायिकांकडूनही लाच घेण्यात आली होती. त्यांनी असेही म्हटले होते की आम आदमी पार्टी (आप) ची सत्ता असलेल्या पंजाबमधील ज्या व्यावसायिकांनी लाच दिली नाही त्यांना शेजारच्या राज्यात दारूच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याची परवानगी नव्हती.

दरम्यान, पदावर असताना अटक होणारे अरविंद केजरीवाल हे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्याचे साथीदार मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांनाही अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील दारू धोरणात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

follow us