Download App

Budget 2025 : केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा, वाचा सविस्तर…

Nirmala Sitharaman Big Announcement In Budget 2025 : देशाचा अर्थसंकल्प (Budget 2025) आज 1 फेब्रुवारी रोजी जाहीर झालाय. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी (Nirmala Sitharaman) सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा केलीये. आता सर्वसामान्यांचं हक्कांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे. 2024 मध्ये तब्बल 40 हजार घरं बांधणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलीये. त्यामुळे यावर्षात अनेक सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर मिळणार आहे. अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनंतर नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा जाणून घेऊ या.

Budget 2025 : अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील महिलांसाठी मोठी घोषणा, 2 कोटी रुपयांपर्यंतचा टर्म इन्शुरन्स…

केंद्रीय अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या घोषणा
1. एआय एक्सिलन्स सेंटर उभारले जातील. एआय शिक्षणासाठी 500 कोटींच्या निधीची तरतूद. कृषी आरोग्य क्षेत्रात एआयचा वापर वाढवण्यात येणार.
2. स्टार्टअप क्रेडिट गॅरंटी 20 लाखापर्यंत वाढवली, 10 लाख क्रेडिट कार्ड जारी करण्यात येणार
3. सर्व सरकारी रुग्णालयात डेकेअर कॅन्सर सेंटर असतील. 200 डेकेअर कॅन्सर सेंटर उभारले जाणार.

Video: यंदाचा अर्थसंकल्प देशाला समृद्धीकडं नेणारा; लोकसभेत सीतारमण यांच्याकडून अर्थसंकल्पाचं वाचन

4. बिहारमध्ये मखाणा बोर्डाची स्थापना केली जाणार
5. पंतप्रधान धनधान्य योजना राबवणार, किसान कार्डची मर्यादा 5 लाख रुपयांपर्यंत वाढणार
6. तूर डाळीसह इतर डाळींच्या उत्पादनासंदर्भात विशेष लक्ष दिलं जाणार
7. महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं देणार
8. भारताला खेळणी उद्योगात जगात अग्रस्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार
9. लघु उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार
10. नॉन लेदर चपलांना सपोर्टसाठी योजना आणणार. मॅन्युफॅक्चरिंग मिशनमध्ये क्लीन टेकला प्रोत्साहन दिलं जाणार
11. ईव्ही बॅटी, विंड टर्बाइन मॅन्युफॅक्चरिंगवर भर
12. एमएसएमई क्षेत्रात क्रेडिट कव्हर वाढवले ​​जाणार
13. गंभीर आजाराशी संबंधित 36 औषधे पूर्णपणे शुल्कमुक्त
14. ज्येष्ठ नागरिकांसाठी कर सवलत दुप्पट, टीडीएस मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत आली.
15. सरकारी शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब
16. खासगी क्षेत्रात संशोधन आणि विकासासाठी 20 हजार कोटींच्या निधीची तरतूद
17. पर्यटन क्षेत्रासाठी मोठी घोषणा, 50 टुरिजम साइट तयार करणार
18. 12 लाख रूपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
19. किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखापर्यंत वाढवली.

follow us