Download App

Budget 2025 : अर्थमंत्री सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर करण्यासाठी नेसली खास साडी, भेट देणाऱ्या दुलारी देवी कोण आहेत?

 Nirmala Sitharaman Wear Cream Colored Saree Budget 2025 : आज देशाचा अर्थसंकल्प जाहीर होतोय. अर्थसंकल्प (Budget 2025) अन् अर्थमंत्र्‍यांची साडी हा नेहमीच चर्चचा विषय राहिला आहे. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) या क्रिम कलरच्या साडीत दिसल्या. आज अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जेव्हा अर्थमंत्रालयात पोहोचल्या, तेव्हा त्यांची शैली वेगळीच दिसली. मिथिला पेंटिंग असलेल्या साडीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा साधा लूक दिसला.

संस्कृतीच्या चित्रपटाची साता-समुद्रापार चर्चा, ‘करेज’चं सँटो डोम्निगो यूएसए फिल्म फेस्टीवलमध्ये खास स्क्रिनिंग!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या साडीने सर्वांचं लक्ष वेधून (Nirmala Sitharaman Saree) घेतलं. बिहारच्या मधुबनीतील प्रसिद्ध चित्रकार पद्मश्री दुलारी देवी यांनी ही साडी अर्थमंत्र्यांना भेट दिली आहे. ही साडी केवळ भारताचा वारसा आणि संस्कृतीच मांडत नाही, तर पंतप्रधान मोदींच्या मेक इन इंडिया उपक्रमालाही पुढे नेणारी आहे.

पद्मश्री दुलारी देवी यांनी डिझाईन केलेली ही साडी केवळ साडी नसून संघर्ष, परंपरा आणि कलेच्या अद्भुत प्रवासाची कथा आहे. दुलारी देवी यांनी ही साडी अर्थमंत्र्यांना भेट दिली होती. अर्थमंत्र्यांना ही साडी भेट देताना दुलारी देवी यांनी ही साडी परिधान करून 2025 चा अर्थसंकल्प सादर करावा, असं सांगितलं होतं. मिथिला आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये क्रेडिट आउटरीचसाठी मधुबनीला भेट दिली, तेव्हा दुलारी देवी यांनी निर्मला सीतारामन यांना ही साडी भेट दिली.

बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात जन्मलेल्या दुलारी देवी एका मासेमारी करणाऱ्या समुदायातील आहेत. दुलारीदेवीला लहानपणापासून मधुबनी आणि चित्रकला शिकण्याची आवड होती. दुलारी देवीचे लहान वयातच लग्न झाले होते. वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी पतीने त्यांना सोडून दिले होते. त्याहूनही मोठं दु:ख जेव्हा त्यांनी मूल गमावलं. यानंतर, उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी 16 वर्षे घरगुती मोलकरीण म्हणून काम केले.

टीम इंडियाने खरंच चीटिंग केली? हर्षितच्या Concussion सब्सटीट्यूटचा वाद चिघळला; काय आहे नियम..

मधुबनीतील प्रसिद्ध चित्रकार कर्पुरी देवी यांना पाहून दुलारीदेवींनाही या कलेची आवड निर्माण झाली. त्यांनी हळूहळू चित्रकला शिकायला सुरुवात केली. इथूनच त्यांच्या प्रतिभेला यशाचा मार्ग सापडला. मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर दुलारी देवी राष्ट्रीय स्तरावरील कलाकार बनल्या. त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. दुलारी देवीचे मधुबनी चित्र हे केवळ रंगांचा संगम नाही, तर समाजात जागरूकता पसरवण्याचं एक माध्यम आहे. त्यांनी आतापर्यंत 10,000 हून अधिक पेंटिंग्ज बनवल्या आहेत, ज्यामध्ये ती बालविवाह, एड्स जनजागृती, स्त्री भ्रूणहत्या यासारख्या विषय आहेत. त्यांची कला केवळ बिहारमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात प्रदर्शनाचा भाग बनली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन या नेहमीच भारतीय हस्तकला आणि हातमागाचा प्रचार करत असतात. यंदा अर्थसंकल्प मांडताना त्यांनी दुलारी देवींनी बनवलेली मधुबनी साडी नेसली, हा केवळ एका कलाकाराचा सन्मान नाही, तर भारताच्या सांस्कृतिक परंपरेला सलाम आहे. या ऐतिहासिक प्रसंगी दुलारी देवी भावूकपणे म्हणाल्या की, मी निर्माण केलेली कला संसदेपर्यंत पोहोचेल, असं मला कधीच वाटले नव्हतं. हे माझ्यासाठी आशीर्वादापेक्षा कमी नाही.

 

follow us