Download App

Mafia Mukhtar Ansari Sentenced मुख्तार अंसारीला न्यायालयाने ठोठावली दहा वर्षाची शिक्षा

लखनौ : उत्तर प्रदेशात माफिया राज संपवण्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भर दिला आहे. अतिक अहमदनंतर आता गुंड मुख्तार अंसारी निशाण्यावर असून मुख्तार अंसारीला न्यायालयाने 10 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. त्यासह न्यायालयाने मुख्तार अंसारीला 5 लाख रुपयाचा दंडही ठोठावला आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशातील गुंडाचे कंबरडे मोडण्याचे धोरण सुरूच ठेवल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.

मुख्तार अंसारी नेमका कोण?

मुख्तार अंसारी हा उत्तर प्रदेशातील मोठा माफिया आहे. मुख्तार अंसारीला राजकारणाचा मोठा वारसा लाभला आहे. मुख्तार अंसारीचे आजोबा डॉ मुख्तार अहमद अंसारी हे महात्मा गांधींजींच्या खूप जवळचे असल्याचे सांगितले जाते. राजकारणात आल्यावर मुख्तार अंसारीही आमदार झाला होता.

मात्र कृष्णानंद राय आणि नंदकिशोर रुंगटा यांच्या खुनाच्या गुन्ह्यात मुख्तार अंसारीला अटक करण्यात आली होती. मुख्तार अंसारीला साक्षिदार फितूर झाल्याने न्यायालयाने त्याची सुटका करण्यात आली होती. मुख्तार अंसारीवर तब्बल 61 गुन्हे दाखल आहेत. महू, वाराणसी, आजमगढ, गाजीपूर या परिसरात मुख्तार अंसारीची मोठी दहशत असल्याचे सांगितले जात आहे.

भाजप आमदाराचा केला होता खून : बाहुबली नेता मुख्तार अंसारीला गँगस्टर गुन्ह्यात १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. मुख्तार अंसारी आणि त्याचा भाऊ खासदार अफजल अंसारी यांच्यावर भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्या खुनाचा आरोप लावण्यात आला आहे. भाजप आमदार कृष्णानंद राय यांचा उत्तर प्रदेशात मोठा निर्दयपणे खून करण्यात आला होता.

Operation Kaveri : 2100 नागरिक सुदानमधून सुरक्षित बाहेर, एस जयशंकर यांची माहिती

त्यासह नंदकिशोर गुप्ता रुंगटा यांच्याही खुनाचा आरोप मुख्तार अंसारीसह त्याच्या भावावर होता. याप्रकरणी मुहम्मदाबाद पोलीस ठाण्यात २००७ मध्ये गुन्हा क्रमांक २०५१ आणि १०५२ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्तार अंसारीला न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. त्यानंतर कृष्णानंद राय यांच्या पत्नीने प्रतिक्रिया दिली आहे. न्यायपालिकेवर आपला विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Tags

follow us