Operation Kaveri : 2100 नागरिक सुदानमधून सुरक्षित बाहेर, एस जयशंकर यांची माहिती

Operation Kaveri : 2100 नागरिक सुदानमधून सुरक्षित बाहेर, एस जयशंकर यांची माहिती

Operation Kaveri For Sudan Crises : जिथे एकीकडे सुदानमध्ये भीषण गृहयुद्ध सुरू असताना, सुदानच्या सैन्याने दुसऱ्या देशातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्याचवेळी भारत सरकारने ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे. यामध्ये आता सुदानमधील आणखी 231 भारतीय दिल्लीत सुखरुप दाखल झाले आहेत.

याबद्दल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करत माहिती दिली की, एकीकडे सुदानमध्ये भीषण गृहयुद्ध सुरू असताना तेथे अडकलेले 231 भारतीय दिल्लीत सुखरुप दाखल झाले आहेत. भारत सरकारकडून संघर्षग्रस्त सुदानमधून आपल्या नागरिकांची सुटका करण्याची मोहीम सुरू आहे. आतापर्यंत 2100 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले असून आतापर्यंत 1600 नागरिक भारतात पोहचले आहेत.

दरम्यान भारतीय वायुदलाने 27 आणि 28 एप्रिलला सुदानमधील 360 भारतीय दिल्लीत सुखरुप आणले ती सुदानमधून आणलेल्या भारतीयांची पाचवी तुकडी होती. यामध्ये भारतीय वायुदलाचे साहसही पाहायाला मिळाले. ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून त्यांनी एका छोट्या हवाईपट्टीत विमान लँड करत 121 भारतीय नागरिकांचे प्राण वाचवले. त्यात एक गर्भवती महिलाही होती.

Muskan Narang : फॅशन डिझायनर मुस्कान नारंगने वयाच्या 25 व्या वर्षी संपवलं आयुष्य

सुदानमध्ये 4 हजारहून अधिक भारतीय राहतात. लष्कर आणि निमलष्करी दले यांच्यातील लढाईमुळे सुदानमध्ये सध्या हिंसाचार होत आहे. तर 3 हजारहून अधिक भारतीय या देशात अडकल्याचं सांगण्यात येत आहे. तर त्यांची सुटका करण्यासाठी सुदान मधील भारतीयांना सौदीची राजधानी जेद्दाहला जहाजाना आणावं लागत मग हवाई मार्गाने मायदेशी आणावं लागत आहे. आतापर्यंत पाच तुकड्यांमध्ये एकूण 967 भारतीयांना सुखरुप परत आणण्यात आलं आहे. सर्व देशांच्या नागरिकांना मायदेशी नेता यावं म्हणून सुदानमध्ये तीन दिवस युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे.

यापार्श्वभूमीवर सुदानमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. त्याच वेळी, सुमारे 500 भारतीय बंदरे सुदानमध्ये पोहोचली आहेत तर काही सध्या मार्गावर आहेत. जिथे त्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारची जहाजे आणि विमाने तयार आहेत. सुदानमधील आमच्या सर्व बांधवांना मदत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube