Odisha News : ओडिशा विधानसभा निवडणुकीत (Odisha News) भाजपने बिजू जनता दलाचा पराभव करत पहिल्यांदाच राज्याची सत्ता हस्तगत केली. यानंतर भाजपने येथे (BJP) राजकीय गणितं जुळवण्याच्या कामाला सुरुवात केली होती. यामध्ये भाजपला पहिलं यश मिळालं. ममता मोहंती (Mamata Mohanty) यांनी बुधवारी (31 जुलै) राज्यसभेच्या सदस्यत्वाचा (Rajya Sabha) राजीनामा दिला होता. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी (Jagdeep Dhankhar) राजीनामा मंजूर केला होता.
यानंतर बिजू जनता दलाच्या माजी खासदार ममता मोहंती यांनी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मोहंती यांनी याआधीच बीजेडीच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. ममता मोहंती सन 2020 मध्ये राज्यसभेच्या खासदार झाल्या होत्या. त्यांचा कार्यकाळ 2026 मध्ये संपणार होता. मात्र त्यांनी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा देऊन टाकला होता.
Odisha Assembly Election Result: पटनायकांनी ‘ओडिशा’ गमावलं; भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल
ममता मोहंती यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक घ्यावी लागेल. विधानसभेतील भाजप आमदारांची संख्या पाहता ही जागा भाजपाच्याच खात्यात येईल. ओडिशात राज्यसभेच्या दहा जागा आहेत. राज्यात आता भाजप सत्तेत आहे. पण पक्षाकडे राज्यात फक्त एक राज्यसभा खासदार आहे. राज्यसभेचं गणित लक्षात घेतलं तर राज्यसभेची सदस्य संख्या 245 आहे. सध्या 225 सदस्य राज्यसभेत आहेत. भाजपाचे 86 खासदार आहेत. एनडीएच्या अन्य घटक पक्षांतील पक्षांचा विचार केला तर ही संख्या 101 होते. बहुमताचा आकडा 113 आहे. राज्यसभेत बहुमत मिळण्यासाठी ओडिशातून मिळणाऱ्या खूप महत्वाच्या आहेत.
भाजपात प्रवेश केल्यानंतर ममता मोहंती यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मोहंती म्हणाल्या, लोकांची सेवा करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदर्शांनी प्रेरित होऊन मी भाजपात प्रवेश केला. हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. मी कोणत्याही षडयंत्राचा भाग म्हणून हा निर्णय घेतलेला नाही. ममता मोहंती यांनी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह आणि ओडिशा प्रभारी विजयपाल सिंह तोमर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. बिजू जनता दलात असताना त्यांच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे ममता मोहंती यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
बालासोरनंतर आता ओडिशाच्या जाजपूरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात, 6 मजुरांचा मृत्यू