बालासोरनंतर आता ओडिशाच्या जाजपूरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात, 6 मजुरांचा मृत्यू

बालासोरनंतर आता ओडिशाच्या जाजपूरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात, 6 मजुरांचा मृत्यू

Odisha Jajpur Train Accident: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर आता जाजपूरमध्ये (Jajpur) मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच आसाममध्ये एक मालगाडीही रुळावरून घसरली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी आज (7 जून) सांगितले की, आसामच्या कामरूप जिल्ह्यात मालगाडी रुळावरून घसरली. यात कोणीही जखमी झाल्याची माहिती नाही. या अपघातात बोकोजवळ सिंगरा येथे कोळसा भरलेल्या ट्रेनचे 20 डबे रुळावरून घसरले. (After Balasore, now in Jajpur, Odisha, a terrible train accident)

याशिवाय आज ओडिशातील जाजपूर रोड रेल्वे स्थानकावर मालगाडीच्या धडकेत सहा मजुरांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, मुसळधार पावसापासून वाचण्यासाठी मजुरांनी उभ्या असलेल्या मालगाडीखाली आश्रय घेतला होता, तेव्हा अचानक मालगाडी इंजिनशिवाय धावू लागली आणि मजुरांना त्याखालून बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.

Anurag Thakur Meets Wrestler: केंद्र सरकार नरमले, कुस्तीपटूंवरील FIR मागे घेणार, मंत्री अनुराग ठाकूरसोबत कुस्तीपटूंची चर्चा

रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, अचानक वादळ आले. मालगाडी उभी असलेल्या शेजारील रेल्वे मार्गावर मजूर काम करत होते. त्यांनी त्याखाली आश्रय घेतला, परंतु दुर्दैवाने इंजिन नसलेली मालगाडी पुढे जाऊ लागली ज्यामुळे अपघात झाला. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, जाजपूर रोड स्टेशन रेल्वे अपघाताची बातमी दुःखद आहे. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांच्या संवेदना आणि सर्व जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना.

दुसरीकडे, झारखंडमधील बोकारो येथे मंगळवारी संथालडीह रेल्वे क्रॉसिंगजवळ मोठा रेल्वे अपघात टळला. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, नवी दिल्ली-भुवनेश्वर राजधानी एक्स्प्रेस जात असताना क्रॉसिंगजवळील रेल्वे फाटकावर ट्रॅक्टर धडकला, परंतु ट्रेनच्या चालकाने वेळीच ब्रेक लावल्याने मोठा अपघात टळला. हा अपघात भोजुडीह रेल्वे स्थानकाजवळील संथालडीह रेल्वे क्रॉसिंगवर झाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube