Fuel Stock : इंधनाचं टेन्शन मिटलं! भारतात साठा किती? कंपन्यांची माहिती समोर…

भारतात ऑगस्टच्या अखेरपर्यंत इंधनसाठा पुरेल इतका शिल्लक असल्याची माहिती इंधन कंपन्यांच्या सुत्रांनी दिलीयं.

fuel ships

fuel ships

Fuel Stock : आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात इंधनाची झळ (Fuel Stock) बसल्याचं चित्र दिसून आलं होतं. काही काळ इराण अमेरिकेच्या युद्धाला पूर्णविराम मिळाला मात्र काही दिवसांनी पुन्हा दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले. याच पार्श्वभूमीवर सध्या देशात असलेल्या इंधनसाठा (Fuel Stock ) किती आहे? याबाबतची माहिती समोर आलीयं. सद्यस्थितीत देशात पुरेसा इंधनसाठा असल्याचं तेल शुद्धीकरण कंपन्यांकडून सांगण्यात आलंय. देशात कच्च्या तेलाचा साठा ऑगस्ट अखेरीपर्यंत पुरेल एवढा असून, ‘एलपीजी’ जुलैच्या मध्यापर्यंत पुरेल एवढा असल्याची माहिती तेल शुद्धीकरण कंपनीच्या सूत्रांकडून देण्यात आलीयं. दिली.

इराण अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्यावर मोठा परिणा झाला आहे. इंधनाची झळ बसत असल्याने भारताने इतर मार्गांचा शोध शुरु केला होता. आता अबुधाबी नॅशनल ऑईल कंपनीकडून भारताने कच्च्या तेलाची खरेदी सुरु केली आहे. त्यामुळे भारताचं इंधन टेन्शन मिटलं आहे.

तुकाराम मुंढेंचा हंटर ! एकाच दिवसात 43 ठिकाणी छापेमारी; तब्बल कोट्यवधी रुपयांची सुपारी जप्त

अबूधाबीच्या या सरकारी कंपनीकडून केलेल्या इंधनखरेदीमुळे देशभरात जुलैच्या मध्यापर्यंत ‘एलपीजी’चा पुरवठा करण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याची माहिती कंपन्यांच्या सुत्रांकडून देण्यात आलीयं. मागील काही दिवसांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएईचा दौरा करुन दोन्ही देशातील व्यापारसंंबंध आणि व्यापार वाढवण्याच्या मुद्द्यावरुन एकमत झालं होतं. त्यानंतर भारताने युएईकडून होणाऱ्या इंधनपुरवठ्यातून देशात 3 कोटी बॅरल इंधनसाठा करण्याची योजना आखलीयं. सध्या युएईकडून भारतात 58 लाख बॅरल इंधनाचा साठा आयात होत आहे. त्यामुळे दोन्ही देशांत व्यापार वाढल्यास इंधनाची चिंता नसणार आहे.

नाशिक विधान परिषदेतून गोकुळ गीतेंनी शेवटच्या क्षणी शस्त्र म्यान का केलं? वाचा पडद्यामागची स्टोरी

दरम्यान, कंपन्यांना थेट जहाजाद्वारे हा पुरवठा होत आहे. अबूधाबीच्या फुजैरा, झिरकू आणि दास बेटावरून या जहाजांमध्ये इंधन भरले जात आहे. ‘हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (एचपीसीएल) ‘टोटल एनर्जीच्या ‘टोट्सा’ आणि ‘मर्कुरिया’ या केंद्रांवरुन नुकतेच युएईकडून 40 लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केलीयं. हा इंधनाचा पुरवठा ऑगस्टमध्ये होणार आहे.

तसेच एचपीसीएलचा राजस्थानमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प असून कंपनीने गेल्याच आठवड्यात ब्राझील आणि प. आफ्रीकामधून 20 लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केलीयं. या प्रकल्पाची दैनंदिन क्षमता 1 लाख 80 हजार बॅरलची आहे. तसेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, मंगोलर रिफायनरी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड कंपन्यांनीदेखील काही दिवसांपूर्वी आखाती देशांमधून इंधनाची खरेदी केलीयं. इंधन आयातीत भारत जगात तिसऱ्या क्रमांचा देश असून एकूण देशांतर्गत मागणींपैकी 88 टक्के इँधन भारताला आयात करावे लागते.

Exit mobile version