Gautam Adani Son Wedding : गर्भ श्रीमंतांच्या विवाह सोहळा विषयीच्या पद्धतींना फाटा देत उद्योगपती गौतम अदानी यांच्या मुलाच्या लग्नात आगळे वेगळेपणा दिसून आला. अदानी यांचा धाकटा मुलगा जीत याचा विवाह सोहळा पार पडला. हा विवाह सोहळा जरी पारंपारिक पद्धतीने पार पडला. असला तरी देखील यामध्ये कुठलाही गर्भश्रीमंतांप्रमाणे अवाढव्य खर्च करण्याऐवजी तब्बल दहा हजार कोटींचा दान हे शाळा आणि रुग्णालयांसाठी देण्यात आलं आहे.
महाराष्ट्रीतील निकालाने राहुल गांधींना 440 व्होल्ट्सचा झटका, एकनाथ शिंदेंनी लावला टोला
तसेच हा विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बडेजाव नव्हता. ना पाहुण्यांसाठी खाजगी विमान होती. ना स्टेजवर कोणी कलाकार होते. ज्याप्रमाणे महा कुंभमेळ्यात गौतम अदानी बोलले होते की, त्यांच्या मुलाचा विवाह सोहळा हा सेलिब्रिटींचा महा कुंभ नसेल तो अत्यंत साध्या पद्धतीने पार पडेल. त्याचप्रमाणे हा विवाह सोहळा पार पडला.
करूणा शर्मांचे चाकणकरांवर आरोप; राज्य महिला आयोगाचा कारवाईचा इशारा
परमपिता परमेश्वर के आशीर्वाद से जीत और दिवा आज विवाह के पवित्र बंधन में बंध गए।
यह विवाह आज अहमदाबाद में प्रियजनों के बीच पारंपरिक रीति रिवाजों और शुभ मंगल भाव के साथ संपन्न हुआ।
यह एक छोटा और अत्यंत निजी समारोह था, इसलिए हम चाह कर भी सभी शुभचिंतकों को आमंत्रित नहीं कर सके,… pic.twitter.com/RKxpE5zUvs
— Gautam Adani (@gautam_adani) February 7, 2025
आज 7 फेब्रुवारी रोजी गुजरातमध्ये अहमदाबाद येथे पार पडला. दिवा शाह हिच्याशी अदानी यांचा मुलगा जीत याचा विवाह झाला आहे. या साधे पद्धतीने पार पडलेल्या विवाहानंतर नुकताच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाच्या विवाह सोहळ्याची या विवाहाशी तुलाना केली जात आहे. मात्र हा विवाहसोहळा अत्यंत कमी लोकांमध्ये पार पडल्या. त्याबाबत अदानी यांनी पोस्ट करत माहिती दिली.
‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस शानदार प्रारंभ
यामध्ये ते म्हणाले की, देवाच्या आशीर्वादाने जीत आणि दिवाचा विवाह सोहळा पार पडला. हा विवाह सोहळा अहमदाबाद येथे आमचे कुटुंब आणि मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने पार पडला. हा अत्यंत छोटा आणि खाजगी कार्यक्रम होता. त्यामुळे मी इच्छा असून देखील अनेक शुभचिंतकांना आमंत्रण देऊ शकलो नाही. त्याबद्दल क्षमा दिवा आणि जीतवर तुमच्या आशीर्वाद असेच राहू द्या.