‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस शानदार प्रारंभ

  • Written By: Published:
‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस शानदार प्रारंभ

Hindu Garjana Chashak :  हिंदू गर्जना प्रतिष्ठान (Hindu Garjana Chashak) आणि पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) यांच्या संयुकक्त विद्यमाने आयोजित ‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस आज शानदार प्रारंभ झाला. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा भव्यदिव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन झाल्यास आपल्याला निश्चितच उत्तम कुस्तीपटू निर्माण करता येतील, अशी विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केला.

राजस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. उद्घाटन समारंभप्रसंगी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्ता मामा भरणे, स्पर्धेचे आयोजक पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष एस.के. जैन, सप महाविद्यालय अध्यक्ष केशव वझे, हिंदकेसरी अमोल बुचडे आदि मान्यवर उपस्थित होते.

कामामध्ये व्यग्र असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार उद्घाटन समारंभास उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगून चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, धीरज घाटेदादा गेले चार वर्ष कुस्तीच्या स्पर्धा आयोजित करत असून आपल्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानासुद्धा राज्याच्या कुस्तीपटूंचे नुकसान नको व्हायला, म्हणून सुमारे 900 पेक्षा जास्त सहभागी असलेल्या या कुस्ती स्पर्धेचे त्यांनी आयोजन केले आहे. त्यांना पुनित बालन यांची योग्य साथ मिळाली असल्याने ही स्पर्धा भव्यदिव्य स्वरूपाची झाली आहे.

पुनीत बालन यांनी आपल्या लौकिकाला साजेशी अशी ही स्पर्धा आयोजित केली असून स्पर्धेत अनेक बक्षीसे-पारितोषिके देण्यात येणार आहे. मी सुध्दा कोल्हापुरचा पैलवान असून स्पर्धेत मिळणारी पारितोषिके पाहून मलासुद्धा या कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्याचा मोह पडला आहे, असे ते मिश्कीलपणे म्हणाले.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्ता मामा भरणे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, कुस्तीपटूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारी अशी ही कुस्ती स्पर्धा आयोजित केली गेली आहे. या स्पर्धेत महिला कुस्तीपटूंचाही सहभाग आहे, ही नक्कीच भुषणावह गोष्ट आहे. मी राज्य क्रीडा मंत्री म्हणून या देशासाठी, राज्यासाठी चांगल्या गोष्टी करण्यासाठी तसेच उत्तम खेळाडूच्या पाठीमागे सहकार्यासाठी मी नेहमीच उभा राहीन, असे आश्वासन देतो. आपली हायस्कूलची एक छोटी आठवण सांगताना ते म्हणाले की, मी पुण्यामध्ये शिक्षणासाठी असताना चिंचेची तालिम येथे काही दिवसांसाठी प्रशिक्षणासाठी जात होतो आणि मीसुद्धा छोटा पैलवान आहे.

शिक्षण प्रसारक मंडळी यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या या मान्यतेने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत स्पर्धेत 14 वर्षाखालील कुमार गटामध्ये 274 खेळाडू, 17 वर्षाखालील गटामध्ये 199, वरिष्ठ गटामध्ये 198, महिला गटात 60, कुमार खुला गटामध्ये 35, वरिष्ठ खुल्या गटामध्ये 76 आणि महिला खुल्या गटामध्ये 26 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.

स्पर्धेत पुण्यासह पिंपरी, चिंचवड, बारामती, मावळ, हवेली, शिरूर, मुळशी, इंदापुर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हे या वेगवेगळ्या जिल्ह्यातून कुस्तीपटू सहभागी झाले आहे. टिळक रोड येथील स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर आज सकाळच्या सत्रामध्ये स्पर्धेत 14 वर्षाखालील कुमार गटाच्या लढती घेण्यात आल्या. मध्यभागी कुस्तीचे आखाडे आणि प्रेक्षक गॅलरी असे भव्य कुस्ती स्टेडियमची निमिर्ती या स्पर्धेसाठी केली गेली आहे.

कोट्यवधींना विकले जाणारे लाल चंदन भारतात कुठे मिळते, नामशेष होण्याच्या मार्गावर का आहे?

मैदानावर मातीचे दोन स्वतंत्र आखाडे तयार करण्यात आले असून आखाड्यांच्या बाजुने क्रीडारसिकांची 10 हजार प्रेक्षकांची बसण्याची सोय केली आहे. तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी येणार्‍या पुरूष आणि महिला पैलवानांसाठी राहण्याची आणि भोजनाची सोय करण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube