करूणा शर्मांचे चाकणकरांवर आरोप; राज्य महिला आयोगाचा कारवाईचा इशारा
![करूणा शर्मांचे चाकणकरांवर आरोप; राज्य महिला आयोगाचा कारवाईचा इशारा करूणा शर्मांचे चाकणकरांवर आरोप; राज्य महिला आयोगाचा कारवाईचा इशारा](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/Untitled-design-3_V_jpg--1280x720-4g.webp)
Mahila Aayog Post on Karuna Sharma for allegations: कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी वांद्रे येथील कौटुंबीक न्यायालयाने (Family Court in Bandra) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना महिन्याला दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश दिले. मात्र, करुणा शर्मांना हे मान्य नाही. त्यांनी याविरोधात हायकोर्टात दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी माध्यमांसमोर बोलताना त्यांनी राज्य महिला आयोग आणि रूपाली चाकणकरांवर भडकल्या होत्या. त्यावर आता महिला आयोगाने एक्स या सोशलमिडीया साईटवर पोस्ट करत उत्तर दिले आहे.
‘एक शिंग तुझ्या नरड्यात कोंबल्याशिवाय राहणार नाही’, संजय गायकवाड राऊतांवर भडकले
महिला आयोगाने या पोस्टमध्ये कोणत्याही व्यक्तीने किंवा महिलेने राज्य महिला आयोगाबाबत चुकीची माहिती पसरली असता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाण्याचा इशारा दिला आहे. तसेच करून यांची कोणतीही तक्रार आयोगाकडे प्रलंबित नाही. तसेच आयोग केवळ न्यायिक दिवाणी गोष्टींमध्ये दखल घेऊ शकतो. असेही पोस्टमध्ये म्हटलं आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगास अर्ध न्यायिक दिवाणी अधिकार आहेत. आयोगास प्राप्त कुठलीही तक्रार आवश्यकतेनुसार समुपदेशन, पोलीस मदत, कायदेशीर सल्ला या माध्यमातूनच सोडवली जाते. न्यायप्रविष्ट बाबींमध्ये आयोग दखल देऊ शकत नाही.
अर्जदार श्रीमती करुणा मुंडे यांच्याकडून.. १/४
— Maharashtra State Commission for Women (@Maha_MahilaAyog) February 7, 2025
काय म्हणाल्या होत्या करूणा शर्मा?
याचवेळी माध्यमांसमोर बोलताना त्यांना महिला आयोगाने रूपाली चाकणकरांबाबत विचारण्यात आलं त्यावर त्या भडकल्याचा पाहायला मिळालं. करुणा शर्मा यांना तुम्ही न्याय मागण्यासाठी महिला आयोगात गेला होतात का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर सडकून टीका केली.
Delhi Elections Result: केजरीवाल अडचणीत? ACB ने बजावली नोटीस, विचारले ‘हे’ 5 प्रश्न
त्या म्हणाल्या कोण महिला आयोग कोण रूपाली चाकणकर त्या महिला आयोगात केवळ नेत्यांना पाठीशी झालेल्या बसल्या आहेत. त्यामुळे मी थेट राष्ट्रीय महिला आयोगात दिल्लीत पैसे खर्च करून गेले आहे निवेदन दिलं आहे की, चाकणकरांना महिला आयोगातून हटवा.मी तक्रार करून देखील त्या धनंजय मुंडेंची बाजू मांडतात. तसेच आतापर्यंत त्यांच्याकडे खूप तक्रारी आल्या आहेत मात्र त्यांनी काहीही केलेले नाही. असेही शर्मा म्हणाल्या.