Download App

गौतम अदानींचा मुलगा अडकणार विवाहबंधनात, कोण आहे दिवा शाह ? जी होणार अदानींची सून

Jeet Adani and Diva Shah Wedding : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी

  • Written By: Last Updated:

Jeet Adani and Diva Shah Wedding : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेल्या अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांनी मोठी घोषणा करत मुलगा जीत अदानी (Jeet Adani) यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. आज गौतम अदानी सहकुटुंबासह प्रयागराज (Prayagraj) येथे सुरु असणाऱ्या महाकुंभ 2025 च्या (Mahakumbh 2025) मेळ्यात सहभागी झाले होते. येथे त्यांनी त्यांच्या कुटुंबासह त्रिवेणी संगमात पूजा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना जीत अदानी यांच्या लग्नाबद्दल माहिती दिली. तसेच या लग्नात सेलिब्रिटी येणार का? याबाबत देखील त्यांनी खुलासा केला.

माध्यमांशी बोलताना गौतम अदानी म्हणाले की, धाकटा मुलगा जीत दिवा शाहशी लग्न करणार आहे. जीत आणि दिवा यांचे लग्न यावर्षी 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. असं त्यांनी सांगितले. तसेच हे लग्न इतर हाय-प्रोफाइल लग्नांपेक्षा खूप वेगळेअसणार आहे. आमची काम करण्याची पद्धत सामान्य माणसासारखी आहे. सामान्य वर्गासारखी आहे. त्यामुळे जीतचे लग्न खूप पारंपारिक आणि अगदी साधे असणार आहे. जे फक्त कुटुंबाच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.

कोण आहे दिवा शाह ?

अदानी कुटुंबाची होणारी सून दिवा जैमिन शाह ही एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आतापर्यंत अदानी कुटुंबाने दिवा शाह यांच्या खाजगी आयुष्याशी संबंधित जास्त माहिती शेअर केलेली नाही.

Justice Alok Aradhe : न्या. आलोक आराधे यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार दिवा शाह शिक्षित असून आर्थिक बाबतीत चांगली जाणकार आहे. तसेच दिवा शाह सध्या त्यांच्या वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करते. दिवा शाहकडे कोट्यवधींची संपत्ती असून लग्जरी लाईफ जगत आहे. असा दावा देखील मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.

follow us