Gold Rate Today : आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत. त्यामुळे सोन्याला मागणी (Gold Rate Today) वाढू लागली आहे. व्याजदरातील कपातीचा परिणाम सोने चांदीच्या दरावर (Gold Silver Rate) होताना दिसत आहे. जागतिक आणि देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात वाढ होऊ लागली आहे. सोन्याचे भाव पुन्हा नवा उच्चांक गाठण्याच्या तयारीत आहेत. देशातील बाजारपेठेत सोन्याचे भावाने 76 हजारांचा टप्पा पार केला आहे.
मंगळवारी अमेरिकी बाजारातसणासुदीच्या आधीच सोने चमकले हजर आणि वायदा दोन्ही व्यवहारात सोन्याचे दर वाढल्याचे दिसून आले. स्पॉट गोल्डचा भाव व्यवहारादरम्यान 2638.37 डॉलर प्रति औंस या नव्या उच्चाकांपर्यंत पोहोचला होता. यूएस गोल्ड फ्यूचरचे दर 2661.60 डॉलर प्रति औंस पर्यंत वाढला होता. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दराने 76 हजारांचा टप्पा पार केला आहे. सीएनबीसी टीव्ही 18 च्या रिपोर्टनुसार आज भारतीय बाजारात 24 कॅरेट सोन्याचे दर 76 हजार 330 रुपये प्रति तोळा इतके झाले होते.
अमेरिकेत फेडरल रिजर्व्हने व्याजदरात कपात केली आहे. या निर्णयामुळे भारतीय शेअर बाजार, क्रिप्टो आणि सोन्याच्या बाजाराला फायदा होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी फेडरल रिजर्व्हने व्याजदरात अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजेच 0.50 टक्के कपात केली होती.
सोने पुन्हा उसळी घेणार; किमत सत्तर हजारीपार जाणार? जाणून घ्या तज्ज्ञाचं मतं
भारतात सण उत्सवांच्या दिवसात सोने खरेदीत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळात सोन्याचे दर आणखी वाढतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नवरात्रीनंतर दिवाळी (Diwali 2024) आणि धनत्रयोदशी या सणांचा काळ सुरू होणार आहे. या हंगामात भारतीय नागरिकांकडून सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.
नवरात्रीनंतर देशात विवाहांचा काळ सुरू होतो. या काळात तर सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे या काळातही सोन्याच्या दरात वाढ होत असते. यावेळी लग्न समारंभाच्या काळात सोन्याचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. या कारणामुळे आगामी काळात देशांतील बाजारात सोन्याचे भाव 78 हजार रुपये प्रति तोळा होतील असा जाणकारांचा अंदाज आहे.
Gold Price Today : ग्राहकांना दिलासा ..! सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या सोन्याचे नवीन दर