सोन्याला झळाळी, 10 ग्रॅम खरेदीसाठी खर्च करावे लागणार ‘इतके’ रुपये

Gold Price Today : देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु असल्याने सराफ बाजारात सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. मात्र भारतीय सराफ

Gold Price Today : सोन्याला झळाळी, 10 ग्रॅम खरेदीसाठी खर्च करावे लागणार 'इतके' रुपये

Gold Price Today : सोन्याला झळाळी, 10 ग्रॅम खरेदीसाठी खर्च करावे लागणार 'इतके' रुपये

Gold Price Today : देशात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु असल्याने सराफ बाजारात सोने (Gold) खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.  मात्र भारतीय सराफ बाजारात (Indian bullion market) गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने अनेकांचे बजेट बिघडले आहे.

जागतिक पातळीवर गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या (silver) मागणीत वाढ झाल्याने देशातील सराफ बाजारात सोने आणि चांदीची किंमत झपाट्याने वाढली आहे. आज भारतीय सराफ बाजारात 24 कॅरेट 10 ग्रॅमची किंमत 74,070 आहे तर शेवटच्या व्यावहारिक दिवसात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 74,060  रुपये होती. तर आज एक किलो चांदीसाठी 91,330रुपये मोजावे लागणार आहे. शेवटच्या व्यावहारिक दिवसात एक किलो चांदीची किंमत  91,320 रुपये प्रतिकिलो होती.

जागतिक पातळीवर सोन्याची मागणी वाढली

मिळालेल्या माहितीनुसार, एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकजण सोने आणि चांदीमध्ये गुंतणवूक करत असल्याने जागतिक पातळीवर सोने आणि चांदीची मागणी वाढली आहे. यामुळे भारतीय बाजारात देखील सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. माहितीनुसार, येत्या काही दिवसात भारतीय सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तुमच्या शहरातील सोन्याचा दर

आज मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 67,778 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,940 प्रति 10 ग्रॅम आहे.

आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 67,778 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,940 प्रति 10 ग्रॅम आहे.

आज नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 67,778  रुपये आहे.तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,940 प्रति 10 ग्रॅम आहे.

सरकारचा मोठा निर्णय, बंद होणार लाखो सिमकार्ड, ‘हे’ आहे कारण 

वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

Exit mobile version