Gold-Silver Price Today : भारतीय बाजारात पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. 24 नोव्हेंबर रोजी दरात तब्बल अडीच हजारांची वाढ झाली होती मात्र पुन्हा एकदा दरात घसरण झाल्याने खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत 2 टक्क्यांनी, तर चांदीच्या किमतीत 5 टक्क्यांनी घसरण झाली. देशांतर्गत वायदा बाजारात (MCX) मंगळवारी रात्री सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,22,250 रुपये (0.06% घट) आणि चांदीचा भाव प्रति किलो 1,45,150 रुपये (0.20% घट) असा नोंदवला गेला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा भाव प्रति औंस 3,562.60 डॉलर्स, तर चांदीचा भाव प्रति औंस 40.91 डॉलर्स इतका होता.
25 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्रात 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 12,263 प्रति ग्रॅम, तर 1,22,630 प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 11,241 प्रति ग्रॅम, म्हणजेच 1,12,411 प्रति 10 ग्रॅम इतका आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 9,197 प्रति ग्रॅम, तर 91,973 प्रति 10 ग्रॅम आहे. खरेदीदारांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, शहर, ज्वेलर्स, GST आणि मेकिंग चार्जनुसार सोन्याच्या प्रत्यक्ष खरेदी किमतीत फरक असू शकतो.
सोने आणि चांदीच्या किमती का घसरल्या?
अमेरिकेच्या टॅरिफमुळेनिर्माण झालेली बाजारातील अस्थिरता
व्हाइट हाऊस आयातित वस्तूंवर शुल्क वाढवू शकते, अशा बातम्यांमुळे जगभरातील शेअर बाजारांत मोठी विक्री (sell-off) पाहायला मिळाली. अनेकदा, जेव्हा शेअर बाजारावर दबाव वाढतो, तेव्हा गुंतवणूकदार इतर ठिकाणचे नुकसान भरून काढण्यासाठी सोने यांसारख्या मालमत्तांची विक्री करतात परिणामी, सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव येतो.
‘या’ दोन राशींना होणार मोठा आर्थिक फायदा; जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल? –
कठोर व्याजदर धोरणांबाबतची चिंता
न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष जॉन विल्यम्स यांनी संकेत दिले आहेत की, महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आणखी काही उपाययोजनांची गरज भासू शकते. यामुळे डिसेंबरमधील बैठकीत व्याजदर वाढवले जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सोन्यावर कोणतेही व्याज मिळत नसल्यामुळे, व्याजदर वाढण्याची शक्यता ही सोन्यासाठी नकारात्मक मानली जाते.
