Chandigarh-Dibrugarh Express Accident: उत्तर प्रदेशमधील गोंडाजवळ (Gonda Train Accident) चंडिगड-डिब्रुगड एक्स्प्रेसच्या (
Chandigarh-Dibrugarh Express) भीषण अपघात झालाय. त्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. परंतु या अपघाताबाबत आता वेगवेगळी माहिती समोर येत आहे.
विशाळगड हिंसाचाराला सरकार कसं काय जबाबदार? अजितदादांचा संभाजीराजेंना सवाल…
अपघातापूर्वी स्फोटासारखा मोठा आवाज झाला. त्यानंतर रेल्वे चालकाने ट्रेनचे इमर्जन्सी ब्रेक लावले. त्यानंतर पटरीवरून डब्बे घसरले असल्याचे रेल्वे चालक (लोको-पायलट) सांगत आहेत. परंतु हा आवाज कसला होता, याबाबत अद्याप पुष्टी झालेली नाहीत, अशी माहिती अनेक वृत्तसंस्थांनी दिलेली आहे. परंतु प्रत्यदर्शी गावकऱ्यांनी वेगळीच माहिती दिली आहे. अपघातानंतर 500 मीटरपर्यंत रेल्वे पटरी उखडली गेली आहे. त्यात इलेक्ट्रिक लाइनचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पटरीच्या दोन्ही बाजूने पाणी भरले गेले. त्यातून रेल्वे ट्रॅक खचला आणि अपघात झाला असावा, असेही प्रत्यदर्शी सांगत आहेत. परंतु अपघाताबाबत रेल्वे प्रशासन किंवा रेल्वे मंत्र्यांकडून स्पष्ट माहिती आलेली नाहीत.
#WATCH | Uttar Pradesh: Restoration work underway at the Chandigarh-Dibrugarh Express derailment site in Gonda
As per North Eastern Railway General Manager Saumya Mathur, 2 people died and 31 got injured. pic.twitter.com/ZoV015hMGQ
— ANI (@ANI) July 18, 2024
पंढरपूरहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, जीप थेट विहिरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू
जिल्हाधिकारी डॉ. नेहा शर्मा यांच्या अपघाताबाबत माहिती देण्यात आली आहे. ट्रेनचे आठ डब्बे पटरीवरून घसरले आहे. त्यात चार जणांचा मृत्यू झालेला आहे. दोन प्रवासी गंभीर जखमी असून, त्यांना लखनऊ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
…तर मुख्य सचिवांच्या दालनाबाहेर आंदोलन; IAS पूजा खेडकर प्रकरणात बच्चू कडुंची उडी!
अपघातानंतर अनेक रेल्वेंची मार्ग बदलण्यात आले आहे. आम्रापाली एक्स्प्रेस मनकापूर जंक्शन-अयोध्या धाम-बाराबंकी जंक्शन मार्गे जाणार आहे. तर गुवाहाटी-जम्मू तवी अमरनाथ एक्स्प्रेस ही मनकापूर जंक्शन-अयोध्या धाम-बाराबंकी जंक्शन या मार्गे जाणार आहे. गोरखधाम सुपरफास्ट एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे.