Download App

“गुगल म्हणजे डिजिटल ईस्ट इंडिया कंपनी” शार्क अनुपम मित्तल गुगलवर का भडकले ?

  • Written By: Last Updated:

शार्क टँक मधील शार्क आणि Shadi.com चे संस्थापक अनुपम मित्तल यांनी गुगलच्या बिलिंग सिस्टिमला ‘बेकायदेशीर’ असल्याचे म्हटले आहे. सोबतच त्यांनी गुगलला ‘डिजिटल ईस्ट इंडिया कंपनी’ म्हटले आहे. उद्योगपती असलेल्या मित्तल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की Google भारतीय कायद्यांचे उल्लंघन करून काम करत आहे आणि पंतप्रधान कार्यालयाचे (PMO) अधिकारी याकडे लक्ष देतील.

अनुपम मित्तल यांनी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये म्हटले आहे की, “गुगलकडून आज भारतीय डेव्हलपर्सना त्यांची पेमेंट सिस्टीम अनिवार्य करण्यासाठी कॉल आला होता. त्यांचा हा आदेश म्हणजे भारतीय कायद्यांचे उल्लंघन आहे. हा नव-वसाहतवाद आपल्या शिखरावर आहे! आशा आहे की मीडिया, न्यायालये आणि पंतप्रधान कार्यालय यात लक्ष देतील. डिजिटल युगातील ही ईस्ट इंडिया कंपनी आहे.”

करदात्यांनो, तुम्ही ITRभरला का? 31 जुलैपूर्वी आयटीआर भरण्याचे ‘हे’ आहेत फायदे

 

भारतीय स्पर्धात्मक आयोगाच्या (CCI) नियमांमुळे गुगलला भारतात आपली बिलिंग सिस्टम बदलून ती युझर चॉईस बिलिंगमध्ये बदलावी लागली. जीपीबीएस अंतर्गत सर्व ॲप्सना खरेदीच्या पेमेंटसाठी गुगल पेमेंट गेटवे अंतर्गत करावं लागतं होत आणि यासाठी कंपनी प्रत्येक खरेदीवर ३० टक्के कमिशन आकारत होती.

विमानात मद्यधुंद प्रवाशाचा प्रताप, बळजबरी करत घेतला फ्लाईट अटेंडंटचा किस

यूसीबीएस २६ एप्रिल पासून लागू होऊ शकते. या अंतर्गत सर्वच प्रकारचे प्रर्याय जसं कार्ड, नेट बँकिंग, युपीआय किंवा वॉलेट उपलब्ध असतील. तसंच ३० टक्क्यांऐवजी २६ टक्क्यांपर्यंत कमिशन द्यावं लागणार आहे. गुगलनं यावर पर्याय काढला आहे. भारताबाहेर कोणत्याही ॲपचा वापर जसं अमेरिका, युरोपमध्ये होत असेल तर त्यासाठी कंपनी आपल्या पेमेंट गेटवेचा वापर अनिवार्य करत आहे. अशातच हे भारतीय कायद्यांच्या विरोधात असल्याचं मत अनुपम मित्तल यांनी व्यक्त केलंय.

Tags

follow us