विमानात मद्यधुंद प्रवाशाचा प्रताप, बळजबरी करत घेतला फ्लाईट अटेंडंटचा किस

विमानात मद्यधुंद प्रवाशाचा प्रताप, बळजबरी करत घेतला फ्लाईट अटेंडंटचा किस

A drunken passenger forced a kiss on a male employee on the plane : गेल्या काही दिवसांमध्ये विमानात (plane) लघुशंका करण्यापासून ते प्रवाशांमध्ये आपापसात झालेली हाणामारी अशा अनेक घटना चर्चेत आल्या होत्या. यातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा विमानात फ्लाइट अटेंडंटचे (Flight attendant) लैंगिक शोषण (sexual abuse) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डेल्टा एअरलाइन्सच्या फ्लाईटमधून अलास्काला जाणाऱ्या विमानात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. विमानातील एका प्रवाशाने फ्लाइट अटेंडंटची गळाभेट घेत जबरदस्तीने किस केल्याचा प्रवाशावर आरोप आहे. कॅप्टनच्या जेवणाच्या ट्रेचीही तोडफोड केल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे.

न्यूयॉर्क पोस्टने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, 10 एप्रिल रोजी मिनेसोटाहून या विमानात 61 वर्षीय प्रथम श्रेणी प्रवासी डेव्हिड ऍलन बर्क याने पुरूष फ्लाईट अटेंडंटच्या गळ्याचे चुंबन घेतले.

झालं असं की, डेव्हिडला टेक ऑफ करण्यापूर्वी ड्रिंक हवी होती. जेव्हा त्याने ड्रिंक मागितली तेव्हा टीसी नावाच्या फ्लाइट अटेंडंटने सांगितले की, फ्लाइट अटेंडंटची रेड वाईन सर्व्ह करण्याची वेळ संपली आहे. ज्यावर डेव्हिड यांनी म्हटलं की, “ठीक आहे, मला तुम्ही लोक आवडतात. मी माझे प्री-डिपार्चर ड्रिंक का मिळू शकत नाही?

‘अजितदादांनी आपली विचारधारा बदलली तर आम्हाला काही…’ उदय सामंतांनी थेट सांगितले

विमानाने टेक ऑफ केल्यानंतर डेव्हिड यांना ड्रिंक देण्यात आली. यानंतर अटेंडंड टीसी हा डेव्हिड यांचा ट्रे घेण्यासाठी परत आला तेव्हा डेव्हिडने त्याला हॅंडशेक केला. आणि नंतर त्याच्या मागे मागे गेला. त्याने टीसीला म्हटलं की, अरे, तू खूप सुंदर आहेस. याबद्दल फ्लाइट अटेंडंटने त्यांचे आभार मानले. त्यानंतर डेव्हिडने मी तुझे चुंबन घेऊ शकतो का? असे विचारले असता फ्लाइट अटेंडंटने उत्तर दिलं की, नाही. यानंतर डेव्हिडने टीसीला बळजबरीने पकडले आणि त्यांचे चुंबन घेत म्हणाला की ठीक आहे, फक्त तुझ्या गळ्यावर चुंबन करत आहे.

डेव्हिडच्या या कृत्याने फ्लाइट अटेंडंटला राग आला आणि त्याने डेव्हिडला केबिनच्या मागच्या बाजूला नेले. यावेळी क्रूच्या आणखी एका सदस्याने सांगितले की, डेव्हिडने कॅप्टनच्या जेवणाचा ट्रे फोडल्याची माहिती दिली. संपूर्ण प्रकरण समजून घेतल्यानंतर पायलटने विमानतळावर संपर्क साधून विमानात घडलेली संपूर्ण घटना सांगितली.

दरम्यान, तोपर्यंत डेव्हिड यांनी तीन ग्लास वाइन प्यायली होती आणि झोपले होते. नंतर एफबीआयने जेव्हा त्यांची चौकशी केली तेव्हा डेव्हिड यांनी सांगिलते की, मला आठवत नाही. मी झोपण्यापूर्वी फक्त एक वाईन प्यायला होतो. सध्या या प्रकरणाचात तपास सुरू आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube